मुंबई : केंद्राने अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातील अनलॉकच्या चौथ्या टप्प्याची नियमावलीही आज जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या सूचनेनंतर राज्यात ई-पास रद्द करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे. (Maharashtra Unlock 4 Guidelines to be announced)
प्रशासनाने ई-पास रद्द करण्याबाबत तयारी दाखवली आहे. अद्यापही खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. त्यामुळे ई-पास रद्द करण्याची मागणी जनसामान्यांकडून केली जात आहे. याबाबत आज गाईडलाईन्स निघण्याची शक्यता आहे.
रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु मेट्रो, रेल्वे, जिम, मंदिर आताच सुरु करण्याबाबत सरकारचा विचार नाही.
दुसरीकडे, राज्य सरकारच्या कार्यालयात उपस्थिती वाढवण्याची शक्यता आहे. सध्या 15 टक्के असलेली उपस्थिती वाढवून 30 टक्क्यावर नेण्याचा विचार आहे. याबाबतही आज आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
केंद्राच्या ‘अनलॉक-4’बाबत गाईडलाईन्स
काय सुरु, काय बंद?
‘या’ गोष्टी बंदच राहणार
केवळ केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या विमानांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जनजीवन आणि देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 1 सप्टेंबरपासून देशात अनलॉक 4 सुरु होणार आहे.
शाळा-कॉलेज बंदच
शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारवर सोपावण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील शाळा-कॉलेज बंद आहेत. 1 सप्टेंबरपासून शाळा-कॉलेज सुरु करण्यास परवानगी मिळू शकते. मात्र, शाळा-कॉलेज सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने राज्य सरकारकडे सोपवला आहे.
VIDEO : महाफास्ट न्यूज 100 pic.twitter.com/WmGa3cMcKB
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2020
संबंधित बातम्या :
ई-पासचे काय होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
(Maharashtra Unlock 4 Guidelines to be announced)