मुंबई : हा हल्लाबोल मोर्चा आहे, महामोर्चा आहे, या मोर्च्याने महाविकास आघाडी आणखीनच मजबूत होणार असल्याचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग आहे. महिलांना महागाईचा अधिक फटका बसत असतो. त्यामुळे महिलांचा या मोेर्चात अधिक सहभाग असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
महिलांचा अनादर या सरकारने अधिक केला आहे. राज्यातील उद्योग गमाविले आहेत. त्यामुळे या सरकारच्या विरोधात कार्यकर्तेच नव्हे तर नागरिकांचाही या मोर्चात सहभाग आहे. शिवसेनेचे सरकार आल्यापासून 2012 पासून शिवसेना सरकारच्या विरोधात भाजपाने खोडा घालण्याचे काम केले आहे. त्याचा शेवट यंदाच्या मार्चमध्ये अखेर झाला आहे. विरोधी पक्षाचे कामच आहे, सरकारवर वचक बसविण्याचे, त्यामुळे आम्ही सरकारच्या कामगिरीचा समाचार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.