राजश्री प्रॉडक्शनचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट सुपरहिट झाला. सलमान खान आणि भाग्यश्री या जोडीची केमिस्ट्री लोकांना खूप भावली. ‘मैने प्यार किया’ चित्रपटासाठी निर्माते सूरज बडजात्या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी एका नवीन चेहऱ्याचा शोध घेत होते. बॉलीवूडमध्ये आपले करिअर करण्यासाठी चंदीगडची 17-18 वर्षांची एक मुलगी धडपडत होती. तिला ही बातमी कळली. सूरज बडजात्या यांना भेटण्यासाठी ती मुलगी चंदीगडहून मुंबईला राजश्रीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. त्या मुलीला पाहिल्यावर सूरज बडजात्या खूप प्रभावित झाले. त्यांनी तिला काही डायलॉग्स बोलायला सांगितले. तिनेही ते डायलॉग्स बिनदिक्कत कोणत्याही अडचणीशिवाय बोलली. सूरज बडजात्या यांनी ‘मैने प्यार किया’ची मुख्य नायिका म्हणून जवळपास तिला निश्चित केले होते. मात्र, वडील राजकुमार बडजात्या यांची परवानगी घेण्यासाठी त्यांनी तिला पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसला बोलावले.
सूरज बडजात्या यांनी जवळपास फायनल केल्याने ती निश्चिंत झाली होती. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा राजश्रीच्या ऑफिसला पोहोचली. सूरज बडजात्या यांनी वडील राजकुमार बडजात्या यांच्याशी तिची भेट घालून दिली. त्यांनीही तिची परीक्षा घेतली. ती परीक्षाही ती पास झाली. त्यानंतर ती मुलगी पुन्हा चंदीगडला परत गेली. अनेक दिवस उलटले. राजश्रीमधून आज, उद्या कॉल येईल याची ती वाट पहात होती. पण, ‘मैने प्यार किया’मध्ये सलमानची नायिका म्हणून भाग्यश्री हिला घेतल्याचे तिला कळले आणि तिच्या अपेक्षेचा भंग झाला.
काही वर्षांनी त्याच मुलीला राजश्रीच्या ऑफिसमधून कॉल आला. पण, तो कॉल होता ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ या चित्रपटात सह नायिकेची भूमिका करण्यासाठी. तोपर्यंत बॉलीवूडमध्ये त्या अभिनेत्रीच्या नावाचा बोलबाला होता. ती मुख्य नायिका झाली नाही. पण, प्रसिद्ध पात्र अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली होती. असे असतानाही ‘मैने प्यार किया’साठी नाव फायनल झाले असतानाही का वगळले याचे कारण तिला अजूनही माहित झाले नव्हते. किबहुना तिने ते कारण शोधण्याचा प्रयत्नही केला नव्हता.
‘मैने प्यार किया’ सुपरहिट झाला. त्यावेळी त्या मुलीला खूप वाईट वाटले. राजश्रीने तिची निवड केली असती तर आतापर्यंत ती बॉलीवूडमध्ये सुपरहिट हिरोईन म्हणून नावाजली असती. परंतु, झाले गेले विसरून तिने ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ साठी आपला होकार कळविला. ‘मैं प्रेम की दीवानी हूं’चे शुटींग सुरु झाले. यादरम्यान तिची बडजात्या कुटुंबीयांशी चांगली ओळख झाली. पण, त्यावेळीही तिने कधीही त्या प्रसंगाचा कधीही उल्लेख केला नाही.
‘मैं प्रेम की दिवानी हूं’च्या शुटींग दरम्यान संपूर्ण कास्ट एकत्र बसली होती. नायक हृतिक रोशन, नायिका करीना कपूर यांच्यासह इतर कलाकार आणि दिग्दर्शक सूरज बडजात्याही तिथे उपस्थित होते. काही वेळाने राजकुमार बडजात्या तेथे आले. चर्चच्या ओघात ते म्हणाले, ‘मैने प्यार किया’ चित्रपटाची आमची पहिली नायिका कोण होती हे माहित आहे का? ते कुणाचे नाव घेतात हे ऐकण्यासाठी सर्वांनी कान टवकारले. काहींनी त्या अभिनेत्रीचे नाव विचारले. तेव्हा राजकुमार बडजात्या म्हणाले, ‘ही काय समोर बसली आहे उपासना…’
राजकुमार बडजात्या यांनी उपासना सिंह हिचे नाव घेताच हृतिक आणि करीनासह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पण, उपासना सिंह हिला उत्सुकता होती ते पुढे काय म्हणतात याची. ‘मैने प्यार किया’मधून तिला का वगळण्यात आले याचे कारण तिला जणू घ्यायचे होते. राजकुमार बडजात्या यांनी भाग्यश्रीचा संदर्भ देत सांगितले, ‘उपासनाला जर आम्ही घेतले असते तर ती फार पूर्वीच चित्रपटांपासून दूर गेली असती. पण खरे कारण हे आहे की सलमानपेक्षा ती जास्त उंच होती. यामुळे तिला नाकारले.’
कदाचित तो असावा. पण यानंतर त्याने उपासनाला ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून काढण्याचे खरे कारण सांगितले. राज कुमार बडजात्या यांनी सांगितले की, उपासनाची उंची सलमान खानपेक्षा जास्त आहे. या कारणास्तव आम्हाला ते काढावे लागले. पण खरे कारण ऐकून उपासना सिंग मात्र हिरमुसली. कारण, सलमानपेक्षा उंच असलेल्या अन्य काही अभिनेत्रीही त्याच्या नायिका झाल्या होत्या. कदाचित तिला संधी मिळाली असती तर ती आतापर्यंत नायिका झाली असती केवळ सहाय्यक अभिनेत्री राहिली नसती. उपासना सिंह हिनेच एका मुलाखती दरम्यान सलमान खानमुळे आपण मुख्य नायिका होऊ शकली नाही याचा हा किस्सा सांगितला.