मुंबई: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी माऊली या सिनेमातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर रितेशने हे गाणं रिलीज करत असल्याची घोषणा ट्विटरवर केली. ‘माझी पंढरीची माय’ असे गाण्याचे बोल आहेत. मराठीचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल या जोडीने हे गाणं गायलं आहे. माऊली हा बहुप्रतिक्षीत चित्रपट 14 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे. तर जेनेलिया देशमुखने या सिनेमाची निर्मिती केली आहे. हिंदुस्तान टाकीज सहनिर्माते आहेत.
आज जे गाणं रिलीज झालं आहे, त्या गाण्याचे लिरिक्स अजय-अतुल आणि गुरु ठाकूर यांचे आहेत.
SONG OUT NOW!
आजच्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, माऊलीचं पहिलं गाणं!! माझी पंढरीची माय!!#MajhiPandharichiMaay #Mauli14Dec #MeMauli #YetoyMauli @geneliad @SaiyamiKher @AjayAtulOnline @guruthakur @mfc @JioMusicHD @h_talkies @AdityaSarpotdarhttps://t.co/OjN8A4cd3d
— Riteish Deshmukh (@Riteishd) November 19, 2018
दरम्यान, रितेशने काही दिवसांपूर्वी माऊली सिनेमाचा टीझर रिलीज केला होता. तो टीझर किंग खान शाहरुखने ट्विटही केला होता. आता अभिनेता अक्षय कुमारने माऊलीचं गाणं ट्विट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे अक्षय कुमारने मराठीत ट्विट केलं आहे. आजच्या कार्तिकी एकादशीला, माऊलीचं पहिलं गाणं!! माझी पंढरीची माय!! मला खूपच आवडलं, तुम्हालाही नक्की आवडेल!! असं ट्विट अक्षय कुमारने केलं आहे.
आजच्या कार्तिकी एकादशीला, माऊलीचं पहिलं गाणं!! माझी पंढरीची माय!! मला खूपच आवडलं, तुम्हालाही नक्की आवडेल!!#MajhiPandharichiMaay #Mauli14Dec #MeMauli #YetoyMauli @geneliad @Riteishd https://t.co/bjMVahmBOy
— Akshay Kumar (@akshaykumar) November 19, 2018
माऊली सिनेमात रितेश देशमुख एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. या सिनेमात रितेशसोबत ‘मिर्झिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सैयामी खैर माऊली चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
संपूर्ण गाणे
पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाची साकार विठ्ठल
हरीनामे झंकार विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
तू बाप तूच बंधू
तू सखा रे तुच त्राता रे
भूतली या पाठीराखा
तूच आता अंधार यातनेचा
भोवती हा दाटलेला रे
संकटी या धावूनी ये तूच आता
होऊन सावली हाकेस
धावली तुजवीण माऊली जगू कैसे
चुकलो जरी कधी तू वाट दावली
तुजवीण माऊली जगू कैसे
करकटावरी ठेवोनी
ठाकले विटेवर काय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
साजिरे स्वरूप सुंदर
तानभूक हारपून जाय
माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय
ना उरली भवभयचिंता
रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
तू कळस तूच रे पाया
मज इतुके उमजुन जाता
राऊळात या देहाच्या मी तुलाच मिरविन आता
लोचनात त्रिभूवन आवघे
लेकरांस गवसुन जाय
माझी पंढरीची माय ,माझी पंढरीची माय
संपू दे गा मोह मनीचा वासना सुटावी हो
जन्म उभा चरणीची त्या वीट देवा व्हावी हो
कळस नको सोनियाचा पायरी मिळावी हो
सावळ्या सुखात इतुकी ओंजळी भरावी हो
भाबडा भाव अर्पिला
उधळली चिंता सारी हो
शरण गे माय आता लागले
चित्त हे तुझीया दारी हो
विझल्या मनातली दिपमाळ चेतली
बळ आज माऊली तुझे दे
‘मी’ तुज्यात विरता माझी राहीलीच ओळख काय
माझी पंढरीची माय , माझी पंढरीची माय
मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
पृथ्वी जल ब्रम्हाण्ड विठ्ठल
जगतासी आधार विठ्ठल
अवघाची साकार विठ्ठल
भक्तीचा उद्गार विठ्ठल
अंतरी मिळे पंढरी ..सावळा हरी ..भेटला तेथ
बोलला कुठे शोधीशी.. मला दशदिशी ..तुझ्या मी आत
जाहलो धन्य ..ना कुणी अन्य .. सांगतो स्वये जगजेठी
तेजात माखले प्राण ..लागले ध्यान.. उघडली ताटी
ना उरली भवभयिंचता
रज तमही सुटले आता
भेदभाव कातरला रे तनमनात झरली गाथा
हेऽऽऽऽऽऽ ‘मी’ तुज्यात विरता माझी राहीलीच अोळख काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
मी पणाच सोडून जाता या कुडीत उरले काय
माझी पंढरीची माय माझी पंढरीची माय
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली