मालेगाव : मालेगावात ‘कोरोना’मुळे अक्षरशः हाहा:कार माजला आहे. मध्यरात्रीत तब्बल 71 जणांचे ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकट्या मालेगावात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 253 वर पोहोचली आहे. (Malegaon Corona Patients Increase)
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात ‘कोरोना’ने थैमान घातलं आहे. दिवसागणिक इथली रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. काल मध्यरात्रीनंतर तब्बल 71 जणांचे अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.
नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये तीन महिन्यांच्या मुलाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे आणखी सहा पोलिसांनाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. एकट्या मालेगावमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 253 वर गेली आहे. त्यामुळे प्रशासनालाही धडकी भरली आहे.
मालेगावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे काल नाशिक दौऱ्यावर होते. ‘मालेगाव शहरात दाट वस्ती आहे. या शहरात होम क्वारंटाईन करणं शक्य नाही. त्यामुळे जिथे क्लोज कॉन्टॅक्ट आहेत, त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केलंच पाहिजे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली होती.
हेही वाचा – Corona : मालेगाव ‘कोरोना’ हॉटस्पॉट कसं बनलं?
‘आपल्याला मालेगाव मिशन यशस्वी करायचं आहे. मालेगावात जास्त संसर्ग झालेला नाही. काही परिवारांमध्येच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. क्वारंटाईन केलेल्या रुग्णांचेच रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. जास्त बारकाईने लक्ष दिलं तर 100 टक्के परिस्थिती आटोक्यात येईल. नाशिकमध्येही मुंबईच्या धर्तीवर टास्कफोर्स तयार करण्याची सूचना देण्यात आली’ असं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.
काही दिवसांपूर्वी मालेगावातील सात जण कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे मालेगावात नागरिकांची चिंता काहीशी कमी झाली होती. पण त्यानंतर प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त रुग्ण सापडत आहेत.
मालेगाव शहरातील हॉटस्पॉट
VIDEO : मुंबईतल्या डॉक्टरांनी करुन दाखवलं! लिलावती रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी!https://t.co/9dM2oFZDDB
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 29, 2020