मालेगाव : मालेगावात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Malegaon Corona Update) चालली आहे. मालेगावात आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे सहाही जण एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे आता मालेगावातील कोरोनाबाधितांची संख्या ही 116 वर येऊन पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या (Malegaon Corona Update) आता 130 झाली आहे.
मालेगावात कोरोनाचा विळखा वाढतो आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने मालेगावची डेंजर स्पॉटकडे वाटचाल होत असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीसह तिघांना कोरोना, आकडा 117 वरhttps://t.co/fzrQ7evNUg#Corona #MumbaiFightsCovid19
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 24, 2020
मालेगावात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू
मालेगावात चौघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तिघे कोरोनाचे रुग्ण होते, तर एकाला कोरोनाची लक्षणं आढळून आली होती. त्यामुळे मालेगावात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 14 वर येऊन (Malegaon Corona Update) पोहोचला आहे.
मालेगावात कोरोना रुग्णांचा आकडा शंभरी पार
मालेगावात पहिले 5 रुग्ण 8 एप्रिला आढळले होते. पण आज (24 एप्रिल) मालेगावमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. मालेगावमधील प्रादुर्भाव रोखण्यासाठी तेथील जिल्हा प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. येथील सर्व नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.
राज्यात कोरोनाचे 6,427 रुग्ण
राज्यात काल (23 एप्रिल) दिवसभरात तब्बल 778 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजार 427 वर पोहोचला आहे. तर काल 14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील 6, पुण्यातील 5, नवी मुंबई, नंदूरबार आणि धुळे मनपा येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे.
Malegaon Corona Update
संबंधित बातम्या :
मुंबईहून पुण्याला परतलेल्या 4 सीआरपीएफ जवानांना कोरोना, 96 जवान क्वारंटाईन
पुण्यात एका दिवसात ‘कोरोना’चे 104 नवे रुग्ण, चार वॉर्डमध्ये शंभरीपार, कोणत्या प्रभागात किती?
केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा, उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला आदेश
राज्यात तब्बल 778 नवे रुग्ण, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 6427 वर