‘कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षा होऊ शकतात’, मल्लिका शेरावतचं 2009 चं ट्विट व्हायरल

| Updated on: Nov 09, 2020 | 5:50 PM

अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि कमला हॅरिस यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.

कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षा होऊ शकतात, मल्लिका शेरावतचं 2009 चं ट्विट व्हायरल
Follow us on

मुंबई : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रेटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) यांनी मावळते अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव केला. यासह जो बायडन अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासह भारतीय वंशाच्या कलमा हॅरिस या देखील उपाध्यक्षपदावर निवडून आल्या आहेत. त्यांच्या विजयाबद्दल भारतात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. त्यांच्या विजयासह त्यांची अनेक भारतीय कनेक्शनही समोर येत आहेत. त्यातच आता अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि कमला हॅरिस यांचा एक फोटो व्हायरल होत आहे (Mallika Sherawat old post and Photo with Kamala Harris goes viral after her victory in US election).

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचा कमला हॅरिस यांच्यासोबतचा बऱ्याच वर्षांपूर्वीचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोसोबतच मल्लिकाचं 11 वर्षांपूर्वीचं एक ट्विटही व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये मल्लिकाने 2009 मध्ये कमला हॅरिस यांची भेट घेतल्यानंतर फोटो ट्विट करत कमला यांच्या राजकीय भविष्याविषयी अंदाज वर्तवला होता. तो आता काहीशा फरकाने खरा ठरला आहे. या ट्विटमध्ये मल्लिकाने म्हटलं होतं, “मी आज एका कार्यक्रमात कमला हॅरिस यांना भेटले. त्या भविष्यात एक दिवस अमेरिकेच्या अध्यक्षा होऊ शकतात.”

कमला हॅरिस आणि मल्लिका शेरावत यांची भेट कशासाठी?

मल्लिका शेरावतने 2011 मध्ये ‘पॉलिटिक्स ऑफ लव’ या चित्रपटात कमला हॅरिस यांच्या आयुष्यावर आधारित एका डेमॉक्रेटिक मिशन वर्करची भूमिका केली होती. या चित्रपटाची तयार करण्यासाठी आणि आपल्या भूमिकेविषयी संशोधन करण्यासाठी मल्लिका 2009 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोच्या दौऱ्यावर गेली होती. यावेळी मल्लिकाने कमला हॅरिस यांची भेट घेतली होती.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मल्लिकाचं राजकीय भविष्य वर्तवणारं ट्विट चांगलंच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक लोक हे ट्विट शेअर करत आहेत आणि त्यावर मजेशीर कमेंट करत आहेत.

हेही वाचा :

जो बायडन आणि कमला हॅरिस यांचे भारताशी अनोखे ‘कनेक्शन’, रितेश देशमुखचा दावा!

वकील ते अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा! कमला हॅरिस यांचा अचंबित करणारा राजकीय प्रवास

Kamala Harris | ‘तिने’ही इतिहास घडवला! जाणून घ्या कोण आहेत कमला हॅरिस?

Mallika Sherawat old post and Photo with Kamala Harris goes viral after her victory in US election