वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉक डाऊन आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी सर्वत्र नाकाबंदी (Vasai PSI rammed) सुरू आहे. पण वसईत नाकाबंदी सुरू असताना एका माथेफिरू मोटारसायकल चालकाने चक्क पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घातली. या अनपेक्षित प्रकाराने पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वसईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Vasai PSI rammed)
सनील पाटील असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी पीएसआय वालीव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
वसई पूर्व एव्हरशाईन सर्कल इथे आज सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उभे आहेत. त्याच पोलिसांच्या जीवावर असे माथेफिरु उठत असल्यामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
ठिकठिकाणी पोलिसांकडून लाठीचा प्रसाद
कोरोना रोखण्यासाठी सरकारकडून सातत्याने घरीच राहण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र तरीही अनेक हुल्लडबाज फेरफटका मारण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. कुणी बाईक घेऊन, तर कुणी चारचाकी घेऊन बाहेर पडत आहे. मात्र अशा हुल्लडबाजांना पोलीस चांगलाच चोप देत आहेत.
घरीच राहा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
सर्वांना कोरोना व्हायरसच्या गांभीर्याची कल्पना आली आहे. घराबाहेर पडू नका. या संकटाची तुलना मी जागतिक युद्धाशी केली आहे. 1971 चे युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शत्रू दिसत नसल्याने हल्ला कुठून होईल माहीत नसते. म्हणून आपण घरात राहील पाहिजे. घरातून बाहेर पडलो की शत्रू घरात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
आता पोलिसी काठीचा हिसका
कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारने संचारबंदी आणि जमावबंदी लागू करुनही न ऐकणाऱ्यांवर आता थेट पोलिसी स्टाईलने कारवाई होणार आहे. स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियम न पाळणाऱ्यांना पोलिसांच्या काठीचा हिसका दाखवण्याचे आदेश दिले आहेत (Anil Deshmukh on strict Police action). ते कोरोनाच्या नियंत्रणाबाबत सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती देताना टीव्ही 9 मराठीच्या विशेष मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी आता विनंती करुन झाली, यापुढे पोलिसी काठीचा हिसका असं म्हणत कारवाईचा इशारा दिला.
संबंधित बातम्या
EXCLUSIVE | विनंती झाली, आता हिसका दाखवा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
‘इकडे ‘चला हवा येऊ द्या’ आधीपासूनच, मी ‘मिसेस मुख्यमंत्र्यां’चं ऐकतो, तुम्ही ‘होम मिनिस्टर’चं ऐका’