फक्त एका वाक्यात मनोज जरांगे यांचा निकाल… छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Oct 30, 2024 | 3:04 PM

शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करीत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राज्यातील गुंतवणूकी संदर्भात पवारांनी दिशाभूल केल्याचे त्यांनी म्हटले आहे.यावर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील फडणवीस यांची बाजू घेत सत्तेत असलेल्या व्यक्तीलाच गुंतवणूकीची माहिती असते असेही त्यांनी म्हटले आहे.

फक्त एका वाक्यात मनोज जरांगे यांचा निकाल... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
Follow us on

निवडणूकीत प्रचारात शरद पवार यांनी अजितदादा यांच्यावर टीका करताना त्यांची नक्कल केली होती. यावर राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्ती केली आहे. निवडणूका आल्या की प्रचाराची भाषणं इमोशनल, नक्कल करणारी आणि टर उडविणारी असतातच ती सर्व पाहून घेऊनच पुढे जायचे असते असे या संदर्भात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. आर.आर. पाटील यांच्यावर अजितदादा यांनी टीका केली आहे. या संदर्भात विचारले असता छगन भुजबळ यांनी आता ते हयात नाहीत त्यामुळे त्यांच्यावर बोलता येणार नाही.परंतू अजितदादांच्या आधी दोन वर्षांपूर्वी मी देखील ही गोष्ट शरद पवार यांच्या कानावर घातली होती अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

महायुतीत जागावाटपावरुन वाद सुरु आहेत. यावर बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की पूर्वी कॉंग्रेस होती, नंतर शिवसेना उदयाला आली. 95 ला कॉंग्रेसच्या विरोधात शिवसेना – भाजपा लढले. कॉंग्रेसचे दोन पक्ष झाले.आता तर शिवसेनेचे दोन आणि आमचे दोन पक्ष झाले. कॉंग्रेस वेगळी झाली. आता सहा पक्ष झाले आहेत. वंचित आघाडी देखील आहे. प्रत्येक जण तिकीट मिळेल म्हणून काम करत असतात. अपेक्षा भंग झाला तर इकडून तिकडे जातात, सगळीकडे झाले आहे. उमेदवार वाढत आहेत. अपक्ष वाढत आहेत असे भुजबळ यांनी सांगितले.

यंदा जरांगे फॅक्टर ?

महायुतीत देखील एकाच ठिकाणी दोन उमेदवार आहेत, याबाबत छगन भुजबळ म्हणाले की आता बघुया काय होते ते, काही लोकांचे काम असे आहे की कामावरच ते निवडून येतात. 5 वर्षे काम केले असेल तर निवडणुकीच्या वेळेला जायची गरज नाही असेही भुजबळ यांनी सांगितले. जरांगे यांनी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. या संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की यंदा काही जरांगे फॅक्टर दिसत नाही असे शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे.