मुंबई : मागील 24 तासांमध्ये राज्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळाला (Mansoon rain updates of the Maharashtra). मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत जोरदार पाऊस झाला. मुंबईतील काही ठिकाणी पावसाने पाणी साचल्याची स्थितीही तयार झाली.
मुंबईतील पूर्व उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. मुलूंड ते सायन या परिसरातही मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळपासून जवळपास 3 तास झालेल्या पावसाने चेंबूरकर हैराण झाले आहेत. चेंबूरच्या पोस्टल कॉलनी परिसरात मनपाचे बुस्टर पंप सुरु असूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. चेंबूरमधील पोस्टल कॉलनीत 3 फूट पाणी साचलं. या पावसाने अगदी गटाराचं पाणी वर येऊन नागरिकांच्या घरात शिरलं.
VIDEO : Mumbai Rain | मुंबई | चेंबूरमध्ये जोरदार पाऊस, अनेक घरात शिरलं पाणी https://t.co/PXGmH9V0cm
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 5, 2020
ठाण्यात कमी जास्त प्रमाणात पावसाचा जोर सुरु आहे. आतापर्यंत 13 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिल्यास सखोल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असून हवेत गारवा जाणवत आहे. ठाण्यात कालपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दरम्यान, ठाण्यातील तलवार पाली येथील नौका विहार या ठिकाणच्या रस्त्यावर पार्क करुन ठेवलेल्या 3 चारचाकी गाड्यांवर झाडं पडले. यात गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन झाड बाजूला करत आहे. या घटनेमध्ये कोणीही जखमी नाही.
मुंबई उपनगरात मालाड, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. बांद्रा परिसरात 200 मिलिमीटर पाऊस, भाईंदर 146 मिलिमीटर, दहिसर 179 मिलिमीटर, महालक्ष्मी 162 मिलिमीटर, मिरा रोड 136 मिलीमीटर, मुंबई कुलाबा 123 मिलिमीटर, सांताक्रुज 189 मिलिमीटर, राम मंदिर 178 मिलीमीटर, पिंपरी-चिंचवड दहा मिलिमीटर, रत्नागिरी 56 मिलिमीटर, पुणे पाषाण 11 मिलिमीटर, सिंधुदुर्ग 63 मिलीमीटर, ठाणे 284 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वसई विरार नालासोपाऱ्यातही पाऊस सुरु आहे. रिमझिम पाऊसासह अधून मधून जोरदार सरी पडत आहेत. 2 दिवसांपासून सतत पडत असणाऱ्या पावसामुळे नागरिकांसह शेतकरीही सुखावले आहेत. वसई तालुक्यात मागच्या 24 तासात 152 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत वसई तालुक्यात 480 मिलीमीटर एवढा पाऊस पडला. वसईत मांडावीत 178 मिमी, अगाशीत 154 मिमी, निर्मलमध्ये 109 मिमी, विरारमध्ये 160 मिमी, माणिकपूरमध्ये 167 मिमी, वसईमध्ये 144 मिमी पावसाची नोंद झाली. एकूणच वसईत सरासरी 152 मिमी पावसाची नोंद झाली.
अंबरनाथ तालुक्यातही सकाळपासून पावसाने झोडपून काढलंय. सकाळी काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातही सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं. शहापूरमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. यानंतर भात लागवडीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
बदलापूरमध्ये रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. बदलापुरात सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. रमेशवाडी परिसरात अनेक हॉटेल आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. हे पाणी जवळपास दोन फुटांपर्यंत वाढलं. बदलापूर पश्चिम स्टेशन रोड सखल भाग असल्याने दरवर्षी या परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळतं.
पालघर जिल्ह्यात वसईत 122.43 मिमी, जव्हार 81.67 मिमी, विक्रमगड 97.0 मिमी, मोखाडा 44.4 मिमी, वाडा 85.0 मिमी, डहाणू 83.52 मिमी, पालघर 122.43 मिमी, तलासरी 78.5 मिमी पावसाची नोंद झाली.
नांदेडमध्ये सततच्या पावसाने सहस्त्रकुंड येथील धबधब्याचा प्रवाह वाढला आहे. नांदेडसह शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला. पैनगंगा नदीवर “इस्लापूर” जवळच्या धबधब्याचा प्रवाह देखील वाढला. समाधानकारक पावसाने किनवट, माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरात आमदाराच्या कुटुंबियांना ‘कोरोना’; मुलगा, सून, नातवाला लागण
‘राजकारणातली नवी आणीबाणी’, रोखठोकमधून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर प्रहार
पुण्यात कोरोना बळींची संख्या वाढतीच, एकाच दिवसात तब्बल 31 रुग्णांचा मृत्यू
Mansoon rain updates of the Maharashtra