टाटा समुहाची सुरुवात 1868 मध्ये झाली होती.आज टाटा समुह भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समुहापैकी एक आहे. आज टाटा समुहाचे काम विविध कंपन्यांमार्फत 150 हून अधिक देशात चालते. वेगवेगळी उत्पादने आणि सेवा टाटा समुहाच्या कंपन्या देत असतात. टाटा समुहाची हॉटेल्स, वीज, कंप्युटर, एअरलाईन्स, कारचा व्यवसायात आहे. टाटा कंपनीच्या वेगवेगळ्या समुहाचे व्यवस्थापन वेगवेगळ्या लोकांकडे आहे. 31 मार्च, 2024 पर्यंत टाटा कंपनीच्या 26 सेक्टरची एकूण किंमत 365 अब्ज डॉलरहून अधिक होती. रतन टाटा यांनी 2017 मध्ये टाटा कंपनीच्या प्रमुख पदावरुन दूर झाले. तरीही ते मानद म्हणून काम करीत होते. त्यांनी त्यांचे चॅरिटीची काम सुरुच ठेवले होते. त्यांच्या नंतर टाटा कंपनीचे प्रमुख नटराजन चंद्रशेखर बनले.
नटराजन चंद्रशेखरन ज्यांना लोक एन. चंद्रशेखरन म्हणूनही ओळखतात. त्यांच्या जन्म 2 जून 1963 रोजी तामिळनाडू येथील एका छोट्या गावात ( मोहनूर ) येथे झाला होता. त्यांचे कुटुंब शेतकरी होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात 1987 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस ( टीसीएस ) मध्ये एक इंटर्नच्या रुपात केली होती. त्यांनी अत्यंत मेहनत करुन आपले कौशल्य दाखवित काम केल्याने त्यांना सप्टेंबरमध्ये टीसीएसचे सीओओ बनविण्यात आले.
एन चंद्रशेखरन यांनी 2009 ते 2017 पर्यंत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हीसेस ( टीसीएस ) या कंपनीचे नेतृत्व केले. त्यानंतर ते टाटा सन्सचे अध्यक्ष झाले. ही टाटा ग्रुपची मुख्य कंपनी आहे. एन. चंद्रशेखर हे पहिले अध्यक्ष आहे ते टाटा परिवारातील नाहीत. त्यांच्या अधिपत्याखाली टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा पॉवर आणि इंडियन हॉटल्स सारख्या 100 हून अधिक कंपन्या आहेत.
एन. चंद्रशेखरन हे मुंबईत अब्जाधीश मुकेश अंबानी निवासस्थान एंटीलिया याच्या जवळील एका आलीशान डुप्लेक्स फ्लॅटमध्ये राहातात. या फ्लॅटची किंमतच 98 कोटी रुपये आहे.