PHOTO | ‘राज’ की बात! ‘कृष्णकुंज’ ठरतंय ‘प्रतिसरकार’?
राज ठाकरे काही दिवस नागरिकांचा वेगवेगळ्या समस्या समजून घेत त्याला न्याय कसा देता येईल याकडे जास्त लक्ष देताना दिसत आहेत. (Different Delegation meet Raj Thackeray)
-
-
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन ठाकरे सध्या सक्रीय दिसत आहेत. एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दुसरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे…
-
-
राज ठाकरे गेले काही दिवस नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या समजून घेत त्याला न्याय कसा देता येईल याकडे जास्त लक्ष देताना दिसत आहेत.
-
-
डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले, पुजारी, मूर्तीकार यांसह अनेकांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या सर्वांनी राज यांच्याकडे विविध मागण्यांचं साकडं घातलं.
-
-
अनलॉक सुरु झाल्यानंतर जिम चालक-मालकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. लॉकडाऊनमुळे जिम व्यावसायिकांचा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकार दरबारी तुम्ही हा प्रश्न मांडा, या मागणीसाठी त्यांनी राज यांची भेट घेतली.
-
-
राज्यातील मंदिर विश्वस्तांकडून मंदिर खुली करावीत अशी मागणी वारंवार केली जात आहे. हा प्रश्न राज्य सरकारकडून न सुटल्याने या सर्व विश्वस्तांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनीसुद्धा मंदिर खुली केली पाहिजेत, असं मत व्यक्त केलं होतं.
-
-
डॉक्टर, नर्सेस तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळातही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत होते. या सर्व डॉक्टरांनी देखील विविध मागण्यांचं निवदेन राज ठाकरेंना दिलं होतं. यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित ही समस्या सोडवली होती.
-
-
मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करता यावा, यासाठी ते राज ठाकरेंना भेटले होते. यानंतर लगेचच सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन डबेवाल्यांना लोकल प्रवास करण्याची परवानगी दिली.
-
-
काही दिवसांपूर्वी डोंगरी येथील कोळी महिलांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. डोंगरी मार्केटमध्ये बेकायदा मासेविक्रेत्यांनी अतिक्रमण केलं असून हे अतिक्रम हटवण्याची मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्यापुढे यावेळी मांडली होती.
-
-
केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मूर्ती घडवणं मूर्तिकारांना कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवावी, या मागणीसाठी पेणमधील मूर्तीकारांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.
-
-
राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा या मागणीसाठी ग्रंथालयांच्या प्रतिनिधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.
-
-
त्यानंतर राज यांनी तात्काळ उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना फोन करत ग्रंथालय चालकांच्या समस्या मांडल्या.
-
-
उदय सामंत यांनी याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अस आश्वासन राज यांना दिलं.