पुणे : पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात जवळपास 15 जणांचा मृत्यू झाला. ही घटना पहाटे 2 वाजताच्या सुमारास कोंढव्यातील तालाब कंपनीसमोर घडली. येथे असलेली भिंत लेबर कॅम्पवर कोसळल्याने अनेक मजूर भिंतीखाली सापडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर अग्निशमन दलाने तत्काळ मदतकार्य सुरु केले आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 3 मजुरांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्यासाठी अजूनही मदतकार्य सुरु आहे. याठिकाणी पुणे, हिंजेवाडी आणि पीएमआरडीएचे अग्निशमन दलाची पथके आणि एनडीआरएफचे पथक मदत कार्य करत आहे.
कोंढवा बुद्रुकमधील सोमजी पेट्रोल पंपाजवळ बिल्डिंगच्या इमारतीची संरक्षण भिंत शेजारी असलेल्या मजुरांच्या शेडवर पडली. कांचन कम्फर्ट या बांधकाम कंपनीकडून मजुरांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पत्र्यांच्या खोल्या बांधल्या होत्या. या खोल्या संरक्षण भिंतीच्या खालच्या बाजूला खड्ड्यात बांधलेल्या होत्या. दरम्यान, पहाटे 2 च्या सुमारास संरक्षण भिंत थेट मजूरांच्या राहण्याच्या ठिकाणी पडल्याने अनेक मजूर त्याखाली सापडले.
Pune: 14 people have died in Kondhwa wall collapse incident. Rescue operations are underway. #Maharashtra pic.twitter.com/5XdHinkjCu
— ANI (@ANI) June 29, 2019
आतापर्यंत घटनास्थळावर 15 मजूरांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात येत आहे.
मृतांची नावे
जखमी
दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार : जिल्हाधिकारी
पुणे-हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.
Pune police commissioner K Venkatesham on wall collapse in Kondhwa: Our team is investigating the reasons behind the incident. Firm action will be taken against those responsible. We will check whether proper permissions were taken and safety measures were followed. #Pune pic.twitter.com/bdl0RLi1Nu
— ANI (@ANI) June 29, 2019
कोंढवा येथील दुर्घटनेवरून प्रथमदर्शनी बांधकाम मजुरांसाठी केलेली राहण्याची व्यवस्था सुरक्षित नव्हती, असेच दिसते आहे. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
District Collector Pune,Naval Kishore Ram: The wall collapsed due to heavy rainfall. Negligence of the construction company is coming to light with this incident.Death of 15 people is not a small matter.Mostly were labourers from Bihar&Bengal.Govt to provide help to the affected. pic.twitter.com/LYyMc7j8ht
— ANI (@ANI) June 29, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही कोंढव्यातील या दुर्घटनेबदद्ल दुःख व्यक्त केले आहे. तसेच जखमींच्या तुंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली. फडणवीसांनी पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी सखोल चौकशीचेही आदेश दिले आहेत.
Extremely saddened to know about loss of lives in the Kondhwa, Pune wall collapse incident.
My deepest condolences to the families and prying for speedy recovery of the injured.
Directed Pune Collector to conduct an in-depth enquiry.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 29, 2019
दोषींवर कठोर कारवाई करा : धनंजय मुंडे
विरोध परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कावाईची मागणी केली आहे. पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अजून काही लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.
पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अजून काही लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. लेबरकॅम्प संदर्भात योग्य तरतूद करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित होत आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी लोमखडेंनी केली.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 29, 2019
लेबरकॅम्प संदर्भात योग्य तरतूद करणे गरजेचे असल्याचे अधोरेखित होत आहे. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे.