मुंबई : सिनेसृष्टीतल्या कलाकारांना सध्या नवं माध्यम खुणावतंय. लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार या नव्या माध्यमाकडे वळले आहेत. सध्या कोरोनामुळे सगळंच ठप्प झालं आहे. मनोरंजनसृष्टीचा विचार केला तर या क्षेत्राचं स्वरुप पाहता लॉकडाऊननंतर सर्वात शेवटचं प्राधान्य या क्षेत्राला असेल. काळाची हीच पावलं ओळखून काही कलाकारांनी या संकटातही संधी शोधली आहे. युट्यूब या माध्यमातून आपली कला लोकांसमोर आणली आहे. (Actor Amey Wagh YouTube Channel)
अभिनेता अमेय वाघनं ‘वाघाचा स्वॅग’ या नावानं स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरु केलं आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळतो आहे. काही दिवसातच त्याच्या युटयूब चॅनेलला 12 हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर मिळाले आहेत. तर व्हिडीओला 50 हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळत आहेत.
“जेव्हा एक दार बंद होतं तेव्हा दुसरं सुरु होतं. अमेरिकेत जेव्हा आमचे ‘अमर फोटो स्टुडिओ’चे 11 प्रयोग रद्द झाले, तेव्हा प्रचंड निराशा झाली. त्यात लॉकडाऊननं आणखी भर पडली. पण शो मस्ट गो ऑन म्हणत या नव्या माध्यमात प्रयोग करुन पाहिला आणि त्याला सगळ्यांनीच उदंड प्रतिसाद दिला,” असं अमेय वाघ ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाला.
“अनेक कलाकार मला फोन करुन विचारतात, आपल्याला काही एकत्र करता येईल का? त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात हे सगळं सकारात्मक उर्जा देणारं आहे.” असेही अमेय वाघ याने सांगितले.
‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना अमेयनं नवीन चॅनेल सुरु करणाऱ्यांना खास सल्ला दिला आहे, “माझा प्रयत्न फसेल का याचा खूप विचार केला जातो. मग आपण नव्या गोष्टी करु पाहत नाही. तर तसं न करता आपली कला लोकांसमोर आणली पाहिजे. जगप्रसिद्ध असणाऱ्या अनेक युटयूबर्सनी त्यांच्या चॅनेलची सुरुवात घरातूनच केली आहे.” यावेळी तो भाडीपाचं उदाहरण द्यायलाही विसरला (Actor Amey Wagh YouTube Channel) नाही.
नवीन youtube channel आणि त्यावरचा नवीन episode ! बघितला का?
Coffee | Vishay Asa Ahe | Amey Wagh | Kshitij Patwardhan | #WaghChaSwag https://t.co/gIXruQn28Q via @YouTube
— Amey Wagh (@ameywaghbola) May 7, 2020
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही काळासोबत स्वत:ला जुळवून घेत यूटयूब चॅनेल सुरु केलं. ‘आशा भोसले ऑफिशियल’ असं त्यांच्या चॅनेलचं नावं आहे.
‘खुळता कळी खुलेना’ या मालिकेतली मानसी अर्थात मयुरी देशमुख, बिग बॉस फेम अभिनेत्री रुपाली भोसले यांनीसुद्धा स्वत:चं चॅनेल सुरु केलं आहे. (Actor Amey Wagh YouTube Channel)
संबंधित बातम्या :
अमेरिका ते मुंबई थरारक अनुभव, अमेय वाघच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का