भोपाळ : मध्य प्रदेशात विवाहित महिला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तरुणाला झाडाला बांधून त्याची धुलाई (Married Woman Boyfriend Beaten Up) केली, तर सूनबाईंनाही चांगलाच चोप दिला.
मध्य प्रदेशातील भिंड गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. दोघांना मारहाण केल्याचा व्हिडीओही वायरल झाला. संबंधित महिला दोन मुलांसह सिलोली गावात राहते, तर तिचा पती जयपूरमध्ये नोकरी करतो. महिलेचे तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा सासरच्या मंडळींना संशय होता.
लग्नानंतर देवदर्शनाला गेलेली नवरी प्रियकरासोबत पळाली
शनिवारी रात्री तरुण महिलेला भेटायला तिच्या घरी आला. आवाज ऐकून घरातील कुटुंबीय जागे झाले आणि महिलेसह तरुणाला रंगेहाथ पकडलं. रात्री घरच्यांनी त्याला चोप दिला आणि हात दोरीने बांधून ठेवले.
दुसऱ्या दिवशी सकाळी महिला आणि तरुणाला फरफटत घराबाहेर आणण्यात आलं. तरुणाला झाडाला बांधून चोप देण्यात आला तर महिलेला लाथा-बुक्क्यांनी बदडण्यात आलं. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतलं.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांनी अटक केली असून महिला आणि युवकाला चोप देणाऱ्या आणखी आरोपींना बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता (Married Woman Boyfriend Beaten Up) आहे.