पाटणा : चीनी सैन्यासोबत लडाखच्या गलवानच्या खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले. शहीदांपैकी पाच जवान बिहारमधील होते. पाटणा जिल्ह्यातील बिहटामध्ये राहणाऱ्या सुनील कुमार यांनीही देशासाठी बलिदान दिले. (Martyr Havaldar Sunil Kumar Last Rites wife demands revenge from China)
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपण प्रत्येक जवानाच्या प्राणाच्या बदल्यात 100-100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको, चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा” अशा भावना शहीद सुनील कुमार यांच्या वीरपत्नीने व्यक्त केल्या.
बुधवारी संध्याकाळी शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव विशेष विमानाने पाटणा विमानतळावर आणण्यात आले. बिहटाच्या तारापूर गावात शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव पोहोचले, तेव्हा संपूर्ण गाव त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झालं. यावेळी दु:ख, राग आणि अभिमानाची भावना दिसली.
हेही वाचा : एका- एका जवानाला तिघांनी घेरले, तरीही भारतीय वीर भिडले, गलवान खोऱ्यातील थराराची इनसाईड स्टोरी
घराच्या अंगणात वीरपत्नी, वीरमाता, आणि अर्धांगवायूग्रस्त वीरपिता शहीद सुनील कुमार यांच्या पार्थिवाला कवटाळून तासनतास रडत राहिले. अखेरच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला नागरिक हातात तिरंगा आणि फुले घेऊन उभे होते. ‘जय हिंद’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
Patna: Mortal remains of Havaldar Sunil Kumar who lost his life in the violent face-off with China in #GalwanValley, being taken for last rites in Bihta. #Bihar pic.twitter.com/RwQzgqLrJ1
— ANI (@ANI) June 18, 2020
शहीद कर्नल संतोष यांच्या आई मंजुळा या दुःखद वृत्तालाही मोठ्या धीराने सामोऱ्या गेल्या. “आता तो मला अम्मा म्हणून हाक मारणार नाही. एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख आहे. पण देशासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, याचा मला अभिमान आहे” असं त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या :
Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?
India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?
(Martyr Havaldar Sunil Kumar Last Rites wife demands revenge from China)