मुंबई : भारतात या वर्षी अनेक कार लाँच करण्यात आल्या. अनेक कार्सना देशभरातील ग्राहकांनी पसंती दर्शवली, तर काही कार्सना ग्राहकांनी सपशेल नाकारलं. अशात कोणत्या कारने भारतीय मार्केटमध्ये सर्वात चांगलं प्रदर्शन केलं, अथवा भारतीयांनी कोणत्या कारला सर्वाधिक पसंती दर्शवली हे सांगणं कठीण आहे. परंतु देशात अशा काही कार मॉडेल आहेत, ज्या गेल्या काही काळापासून सातत्याने भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. ज्या कार्सनी भारतीयांची मनं जिंकली आहेत. या कार भारतीय मार्केटचं नेतृत्व करत आहेत. या दमदार कार्सच्या यादीत Maruti Suzuki ची स्विफ्ट (Swift) ही कार सर्वात वरच्या स्थानावर आहे. कारण ही कार देशात सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. (Maruti Suzuki Swift Remains The Highest Selling Car Model In India says JATO report)
2005 मध्ये लाँच केलेली ही कार सातत्याने भारतीय मार्केटवर वर्चस्व गाजवत आहे. देशात दरवर्षी सर्वाधिक विक्री झालेल्या कार्सच्या यादीत मारुतीची स्विफ्ट दरवर्षी वरच्या स्थानावर असते. यंदाही स्विफ्टने तिचं स्थान कायम राखलं आहे. JATO Dynamics India द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार Maruti Suzuki ने जून 2020 आणि नोव्हेंबर 2020 दरम्यान दर महिन्याला सरासरी 15,798 युनिट्सची विक्री केली आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीचा काळातही कंपनीने बाजारातील स्वतःचं स्थान डगमगू दिलं नाही.
गेल्या सहा महिन्यातील देशातील 10 सर्वश्रेष्ठ कार मॉडेल्सपैकी सात मॉडेल्स मारुती सुझुकीचे आहेत. ही आकडेवारी स्पष्ट करतेय की भारतीय मार्केटवर मारुती सुझुकीचा वरचष्मा आहे. मारुती हीच भारतात सर्वाधिक विक्री करणारी कारमेकर कंपनी आहे. भारतीय मार्केटमध्ये मारुतीचा 55 टक्के हिस्सा आहे. ह्युंदाय कंपनी दोन मॉडेल्ससह भारतीय मार्केटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच ह्युंदायची सिस्टर ब्रँड किआ मोटर्सदेखील सेल्टॉससह मैदानात आहे.
मारुती सुझुकीची वॅगनआर ही कार सरासरी 14,466 यूनिट्सच्या विक्रीसह भारतीय मार्केटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर अल्टो 800 ही कार 14,461 युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या स्थानावर आहे. Maruti Suzuki Baleno च्या सरासरी 14,316 युनिट्सची विक्री झाली आहे. या आकडेवारीसह बलेनो देशात चौथ्या क्रमांकावर आहे. ह्युंदायची क्रेटा देशात पाचव्या क्रमांकावर असून या कारच्या सरासरी 11 हजार 480 युनिट्सची विक्री झाली आहे.
सरासरी 11,328 युनिट्सच्या विक्रीसह मारुती सुझुकी डिझायरने भारतीय मार्क्टेमध्ये सहावं स्थान पटकावलं आहे. या यादीत मारुती सुझुकी ईको सातव्या नंबरवर आहे. ईकोच्या सरासरी 9522 युनिट्सची विक्री झाली आहे. ह्युंदाय ग्रँड आय 10 नियॉस ही कार सरासरी 9,380 युनिट्सच्या विक्रीसह देशात आठव्या क्रमांकावर आहे. किआची सेल्टॉस कारही या यादीत आहे. सरासरी 8,871 युनिट्सच्या विक्रीसह सेल्टॉसने नववं स्थान पटकावलं आहे. मारुती सुझुकी एर्टिगा ही कार देशातील सर्वाधिक विक्री झालेल्या कार्सच्या यादित 10 व्या क्रमांकावर असून या कारच्या सरासरी 8,067 युनिट्सची विक्री झाली आहे.
संबंधित बातम्या
सरकारचा मोठा निर्णय! वाहन चालकाच्या बाजूला बसणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होणार ‘हे’ नियम…
हे वाचलंत का? ‘या’ राज्यात CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार
नव्या वर्षात महिंद्रा लाँच करणार पाच एसयूव्ही कार, जाणून घ्या सर्व फिचर्स
(Maruti Suzuki Swift Remains The Highest Selling Car Model In India says JATO report)