नागपूर : देशात 72 दिवसांनी लॉकडाऊन शिथील करण्यात आला (Mask use compulsory Nagpur) आहे. राज्यातही हळूहळू लॉकडाऊन शिथील केला जात आहे. आजपासून दुकानं, बाजार सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी गेल्यास कारवाई केली जाणार आहे. मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे आदेश नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले (Mask use compulsory Nagpur) आहेत.
मास्क न घालता कुणी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गेल्यास सुरुवातीला त्यांच्याकडून 200 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. तीन वेळा जर एखाद्या व्यक्तीवर मास्क न घातल्यामुळे दंड वसूल केला असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.
तुकाराम मुंढेंनी दिलेल्या आदेशानंतर आजपासून नागपूर शहरात मॉर्निंग वॉक, खरेदी, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.
कोरोनाला आळा घालण्यासाठी हे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. राज्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर मास्क घालणे सक्तीचे केले आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीमध्येही मास्क घालणे बंधनकारक केले आहे.
दरम्यान, राज्यात आजपासून लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. टप्प्या टप्प्यात देशासह राज्यातील लॉकडाऊन उठवला जात आहे. त्यामुळे नागरिक आता घराबाहेर पडू शकतात. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने मास्कचा वापर करणे गरजेचे असल्याने मास्क नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
देशात 8 जून पासून हॉटेल आणि धार्मिक स्थळं सुरु केली जाणार आहे. य ठिकाणीही ज्यांनी मास्क घातलेले असेल अशा नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. जे लोक मास्कचा वापर करत नाहीत अशा लोकांना मंदिरात किंवा हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
संबंधित बातम्या :
राज्यात ‘पुनश्च हरिओम’, पहिला-दुसरा टप्पा आजपासून, काय सुरु काय बंद?
ऑफिस, हॉटेल, रेस्टॉरन्ट, धार्मिक स्थळं 8 जूनपासून सुरु होणार, गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर