नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या कुटुंबासह सध्या भारत दौऱ्यावर (Melania Trump Diet) आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पत्नी मेलानिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर हेही भारतात आले आहेत. ट्रम्प यांचे कुटुंब अमेरिकेची फर्स्ट फॅमिली म्हणून ओळखलं जातं. डोनाल्ड ट्रम्प हे खाण्याचे फार शौकीन असून त्यांना बीफ, मांसाहारी पदार्थ, फ्रेंच फ्राईज, पिझ्झा, केएफसीचे चिकन फार आवडते. मात्र फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प या खाण्या-पिण्याच्या बाबत फार जागृक (Melania Trump Diet) आहेत.
मेलानिया यांचे वय 49 आहे. त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात होतात. त्यांचे वय इतकं असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर याचे परिणाम दिसत नाही. याचे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचे डाएट.
मेलानिया या लग्नापूर्वी मॉडलिंग करत असल्याने त्यांनी आरोग्याला पोषक असणाऱ्या आहाराचा समावेश करतात. मेलानिया दरदिवशी विटॉमिन, मिनरल्स, अँटीऑक्सिडेंट ही पोषक तत्त्वे असलेली फळ खातात. त्या दिवसाला 7 फळं खातात. याशिवाय त्या दररोज फळांचा ज्यूस (What Does Melania Trump Eat) पितात.
विशेष म्हणजे मेलानिया कोणत्याही प्रकारचे डाएटिंग करत नाहीत. त्या फक्त निरोगी आणि संतुलित आहार (Melania Trump Diet) घेतात.
Looking forward to hosting members of the @governors_nga & their spouses at the @WhiteHouse Governor’s Ball tomorrow night. It is an annual tradition to come together for a bipartisan gala to strengthen the friendships between states & their leaders. pic.twitter.com/zCtaptCY1A
— Melania Trump (@FLOTUS) February 8, 2020
सकाळी नाश्त्याचा विचार केला तर मेलानिया आपल्या दिवसाची सुरुवात फायबरयुक्त ओटमील किंवा पौष्टिक पदार्थ असलेल्या स्मूदी खातात. मेलानिया आपल्या ब्रेकफास्टमध्ये जास्त पदार्थ न खाता फक्त प्रोटीन्स आणि मिनरल्स असणारे पदार्थ खातात. त्यामुळे त्यांचे शरीर, केस आणि त्वचा निरोगी (What Does Melania Trump Eat) राहते.
मेलानिया यांच्या लूक आणि फिगर पाहता त्या साखरयुक्त पदार्थ कमी खातात. पण गोड अजिबात खात नाही असे नाही. मेलानिया यांना कोणाताही पदार्थ आवडत नाही. जर त्यांना एखादा पदार्थ खायची इच्छा झाली तर त्या फळ खातात. अन्यथा थोडं चॉकलेट खातात. चॉकलेट व्यक्तिरिक्त मेलानिया यांना आईस्क्रीमही खायला आवडते.
.@POTUS and I had a great visit with the Prime Minister of Greece, @kmitsotakis and @MarevaGrabowski at the @WhiteHouse yesterday. pic.twitter.com/I39BgQEVQg
— Melania Trump (@FLOTUS) January 8, 2020
फळ, भाज्या आणि विटॉमिनयुक्त पदार्थांसोबत त्या स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी पितात. पाणी हे मेलानिया यांचे सर्वाधिक प्रिय पेय पदार्थ आहेत. त्या दिवसभर खूप पाणी पितात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर पडतात. याच कारणामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एजिंगचा परिणाम दिसत नाही. दरम्यान पाण्याव्यतिरिक्त त्या कधीकधी डाएट कोक (What Does Melania Trump Eat) पितात.
संबंधित बातम्या :
कपडे आणि मेकअपसाठी पाण्यासारखा पैसा खर्च, मिसेस ट्रम्पच्या सौंदर्याचं रहस्य काय?