पुणे : पुण्यात पावणे 11 लाख रुपयांची मेफेड्रॉन ड्रग जप्त करण्यात आली आहे (Mephedrone Seized). पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Pune Police Anti-Drug Squad) ही धडक कारवाई करत मेफेड्रॉनसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला (Mephedrone Seized).
या कारवाईदरम्यान, 212 ग्रॅम 650 मिलीग्रॅम मेफेड्रॉन ड्रग जप्त करण्यात आली आहे. त्याशिवाय, कात्रज चौकातून दोघांना अटक करण्यात आली आहे. विसारत अली सना उल्ला आणि ब्रिजेश उपेंद्र शर्मा असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
कात्रजमध्ये जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या बिल्डिंगसमोर पुणे-मुंबई बायपासकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुला एक स्विफ्ट कार उभी होती. कारमध्ये असलेल्या विसारत अली सना उल्ला आणि ब्रिजेश उपेंद्र शर्मा यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली. तेव्हा पोलिसांना त्यांच्याकडून 10 लाख 63 हजार रुपये किमतीचे 212 ग्रॅम 650 मिलीग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून मेफेड्रॉनसह स्विफ्ट कार आणि दोन मोबाईल असा एकूण 15 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रविवारी (25 ऑक्टोबर) मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. पुणे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी याबाबतची माहिती दिली.
पुणे-बंगळुरु महामार्गावर खासगी बसमधून 3 कोटी 64 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्तhttps://t.co/joiG3f2jcr
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 25, 2020
Mephedrone Seized
संबंधित बातम्या :
युटयूबवर व्हिडीओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न, आरोपींना बेड्या