मुंबई : साधेपणा, स्वत:ची स्वप्ने जगणाऱ्या एका सामान्य मुलीची ताकद आणि तिचा प्रवास पाहण्यासाठी तयार राहा. या जागतिक महिला दिनाला अर्थात 8 मार्चला इतर स्त्रियांना प्रेरित करेल असा “मेरी खोज मेरे हाथ” हा लघुपट 8 मार्च 2019 रोजी Eros Now वर प्रदर्शित होणार आहे. “मेरी खोज मेरे हाथ” या लघुपटाचं लेखन तृष्णा प्रकाश सामत यांनी केलं असून, त्याच यात प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर यामध्ये बाहुबली सिनेमात प्रभासला आवाज देणारा अभिनेता शरद केळकरचा आवाज या लघुपटातून ऐकायला मिळणार आहे.
या लघुपटाचा ट्रेलर पाहा –