सरकारी कार्यालयातही #MeToo, वरीष्ठावर महिला कर्मचाऱ्यांचा आरोप

| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

पुणे : मीटू चळवळ आता सरकारी कार्यलयातही पाहायला मिळत आहे.पुण्यातील सहकार आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप दोन महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. या  विरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने निदर्शने केली. सेंट्रल बिल्डिंग येथे सहकार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आपली व्यथा सांगताना दोन्ही महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. माझ्या हाताखाली काम करा राणी […]

सरकारी कार्यालयातही #MeToo, वरीष्ठावर महिला कर्मचाऱ्यांचा आरोप
Follow us on

पुणे : मीटू चळवळ आता सरकारी कार्यलयातही पाहायला मिळत आहे.पुण्यातील सहकार आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप दोन महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे. या  विरोधात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने निदर्शने केली. सेंट्रल बिल्डिंग येथे सहकार आयुक्त कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आपली व्यथा सांगताना दोन्ही महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. माझ्या हाताखाली काम करा राणी सारखं ठेवेल, किती सुंदर दिसता, कुठून साड्या आणल्या, मी पण साड्या आणतो, अशी शेरेबाजी करत अश्लील हावभाव केल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे.

पीडित महिलेच्या घराजवळ थांबणं, अवेळी वारंवार फोन करणं,  पाठलाग करणं,  मिसकॉल मारत असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत. दोन्ही महिला सहकार खात्यात कनिष्ठ कर्मचारी म्हणून काम करतात. तर उपलेखा परीक्षक असलेला वरिष्ठ अधिकारी गेल्या एक वर्षापासून छळ करत आहे. या प्रकरणी अनेकवेळा सहकार आयुक्तांकडे तक्रारही करण्यात आली, मात्र वरिष्ठ पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित महिलांनी केला आहे. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास बेमुदत आंदोलनाचा ईशारा महिलांनी दिला आहे.

हॉलीवूडमध्ये गाजलेल्या मीटू चळवळीला देशातही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. देशात आतापर्यंत मीटू चळवळीतून अनेक राजकीय तसेच बॉलीवूड आणि इतर क्षेत्रातील दिग्गजांची नावे समोर आली आहे. या चळवळीच्या माध्यमातून अनेक वर्ष शांत असलेल्या पीडितांनी आवाज उठवला आहे. मीटू चळवळीच्या माध्यमातून अनेक महिलांनी पुढे येत आपल्यावर झालेल्या अन्यायावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.

या चळवळीमुळे ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांचंही नाव समोर आलं आहे. आलोकनाथ यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबत अभिनेता रजत कपूर याच्यावरही लैंगिक छळाचे आरोप एका महिला पत्रकाराने केला आहे. यावर रजत कपूर यांनी माफीही मागितली होती. तसेच एआयबीचा कलाकार उत्सव चक्रवर्तीवरही लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले होते.

सेलिब्रिटी कन्सलटंट सुहेल सेठ याच्यावर तीन महिलांनी मीटू चळवळीच्या माध्यमातून आरोप केले. सुहेल सेठने सर्वासमोर गैरवर्तन आणि चुंबन केल्याचे या तीन महिलांनी सांगितले आहे.