हिंदूना एक रुपया मिळत असेल तर मुस्लिमांना…? अब्दुल सत्तार यांची मागणी काय?

| Updated on: Jun 26, 2024 | 9:57 PM

मनोज जरांगे पाटील साहेब आणि मी आता राजकारणात आहे, मी जर त्यांचं काम नाही केलं तर ते आमच्या विरुद्ध उभे राहणार आहेत तर आम्हाला त्याचं स्वागतच करावं लागेल असेही मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

हिंदूना एक रुपया मिळत असेल तर मुस्लिमांना...? अब्दुल सत्तार यांची मागणी काय?
abdul sattar
Follow us on

संभाजीनगर – आमच्याकडे 100 दिवस आहेत, त्यामुळे सगळे निर्णय लोकहिताचे घेणार आहे. सतरा ते अठरा वर्षांत प्रथमच एवढे काम झाले आहे. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या समाजातील मुलांचे भविष्य बनवण्यासाठी कौशल्य विकास अंतर्गत 60 कोटी रुपये दिले आहेत. महाराष्ट्रात मुस्लीमांची लोकसंख्या 18 टक्के आहे त्याप्रमाणे बजेट मिळायला हवे. एकनाथ शिंदे साहेबांचे खरंच आभार मानले पहिले त्यानी मुस्लिम धार्मियांचा विचार करून एवढा निधी आपल्याला दिला आहे. आपल्याला पण त्यांच्याबद्दल विचार करायला हवा असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

मी ज्या खात्याचा मंत्री आहे, त्या खात्याच पहिलेच आयुक्तालय बनले ते पण आपल्या संभाजीनगरमध्ये. मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्याच पहिलेच आयुक्तालय बनले ते पण आपल्या संभाजीनगरमध्ये असेही मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी म्हटले आहे. आपल्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाची 14 एकर जमीन आहे, त्यातील 5 एकर आमच्या विभागाला द्यावी अशी मागणी सत्तार यांनी यावेळी केली.

हज हाऊसमध्ये सर्वात भारी मस्जिद बांधली मात्र, काही लोक त्याला विरोध करत आहेत, मी ज्यावेळी कृषी मंत्री होतो त्यावेळी एक रुपयात पीक विमा दिला होता. हमारे हिंदू भाईयो को एक रुपया मिल राहा हे तो मुस्लिम भाइयों को भी 10 पैसे मिलने चाहिये. देशात हिंदूचा सन्मान आहे तसा इतरांचा सन्मान आहे, त्यापेक्षा थोडा कमी पण आम्हाला देखील सन्मान मिळायला हवाय. आमच्या मुलांचे भविष्य बनवण्यासाठी शासनाने मदत केली, कौशल्य विकास अंतर्गत 60 करोड दिले, आता आम्ही घरकुल योजना आणणार आहोत असेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

न्याय देताना जात पाहू नये…

मला मराठी येत नव्हती मला लोक मतदान करत नव्हते, मी मराठी शिकलो मला लोकांनी निवडून दिले. 3 लाख 20 हजार हिंदू बांधव माझ्या मतदार संघात आहे त्यामुळे मी निवडून येतो. आपण न्याय देताना समाज पाहू नये, जात पाहू नये हेच मी पाहातो. एकनाथ शिंदे साहेबांचे खरंच आभार मानले पहिले त्यानी मुस्लिम धार्मियांचा विचार करून एवढा निधी आपल्याला दिला. आपल्याला पण त्यांच्याबद्दल विचार करायला हवा. माझी टोपी काढण्याची चर्चा सध्या फारच सुरू झाली आहे. कोण येणार टोपी काढायला ? कधी येणार याची उत्सुकता सर्वांना लागली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दानवे यांचे नाव न घेता टोला

मला हिंदू बांधवांनी सुद्धा मतदान केलेलं आहे. दरवेळेस मी 30 ते 40 हजार मतांनी निवडून येतो. तरी सुध्दा काही जण म्हणत आहे की सिलोडच पाकिस्तानमध्ये रुपांतर होतंय.. असे सांगत अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. माझं सर्वांना आवाहन आहे, कोणी कोणाची जात नाही पाहिली पाहिजे, धर्म नाही पाहिला पाहिजे असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. मी ज्या सरकारमध्ये मंत्री आहे ते सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, मात्र मुसलमानाना जेव्हापासून अल्पसंख्यांक विभाग देण्यात आला, तेव्हापासून कधीच एवढी मदत मिळालेली नाही, तेवढी मदत या सरकारने केली असल्याचे अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.