नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृह (labour Cant Traveled from one state to another) मंत्रालयाने मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास बंदी घातली आहे. नुकतंच गृह मंत्रायलाने याबाबतची एक मार्गदर्शक सूचना जारी करत सर्व राज्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहे. तसेच जे मजूर ज्या कोणत्याही राज्यात अडकले आहेत, त्यांनी तिथेच राहावं, असेही या परिपत्रकात म्हटलं आहे.
स्थानिक सरकाने राज्यात त्यांना काम उपलब्ध करुन द्यावं, असेही या नमूद करण्यात आलं आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यान कोणालाही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही.
कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक स्थलांतरित मजूर (labour Cant Traveled from one state to another) पायी चालत आपापल्या गावी निघाले होते. या पार्श्वभूमीवर नुकतंच केंद्र सरकारच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर स्थलांतरित मजुरांबाबत केंद्र सरकारकडून निर्देश जारी करण्यात आले.
यानुसार, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कोणत्याही मजुरांना राज्याच्या बाहेर पाठवता येणार नाही. त्या मजुरांनी त्या ठिकाणी राहूनच काम करावे. तसेच जे मजूर मदत केंद्रात आहे. त्यांच्या कौशल्यांचा वापर करुन घ्यावा, असेही यात नमूद केलं आहे.
Ministry of Home Affairs (MHA) issues Standard Operating System for the movement of stranded labourers within the state/union territory – “There shall be no movement of labour outside the state/UT from where they are currently located.” pic.twitter.com/qo0UFccp6r
— ANI (@ANI) April 19, 2020
या मजुरांना शेती, बांधकाम, निर्मिती, रोजगार हमी या योजनेच्या कामासाठी काम करता येऊ शकतं. मात्र सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊनचे नियम पाळून करता येणार असेही यात म्हटलं आहे.
ज्यांना त्यांच्या मूळ कामाच्या ठिकाणी जायचं असल्यास, त्यांची आरोग्य तपासणी करुन कामाच्या ठिकाणी पाठवता येणार आहे, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले.
दरम्यान राज्यातील मजुरांना कामावर जाण्याची परवानगी देण्यात आली असून तरी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मजूर वाहतुकीस बंदी घालण्यात आली (labour Cant Traveled from one state to another) आहे.
केंद्राच्या सहकार्यानं महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना घरापर्यंत पोहोचवू, उद्धव ठाकरेंचा शब्द
स्वातंत्र्य आणि मोकळेपण देण्यास सरकार अनुकूल आहे. मात्र सद्यस्थितीत बंधनाशिवाय पर्याय नाही. स्थलांतरित मजूर आता शांत झाले आहेत. मजुरांसंबंधी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरु आहे. लवकरच केंद्राशी बोलून निर्णय होईल, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरित मजुरांना आश्वस्त केले.
महाराष्ट्र सरकार तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवेल. घरी जाल तेव्हा आनंदाने जा, भीत भीत नको. काही दिवसांचाच तर सवाल आहे, हेही दिवस जातील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.