नवी मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस शहरात झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाने देश हादरला आहे. त्यातून लोक अजूनही सावरलेले नाहीत. त्याचदरम्यान नवी मुंबई शहरातही एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (Minor girl raped in Navi Mumbai)
या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका 25 वर्षीय इसमाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपीच्या पत्नीवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा त्याची पत्नी व सहा वर्षाच्या मुलासह नेरुळ गावात राहत असून पीडित मुलगी त्याच्या घराशेजारी राहत होती.
आरोपीला सहा वर्षाचा मुलगा असून त्याचा सांभाळ करण्यासाठी त्याने पीडित मुलीला घरी आणले होते. त्याचदरम्यान त्याने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना काही घडली आहे. याप्रकरणी दोघांवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पत्नी गावी गेल्याचा फायदा घेऊन नराधमाने अनेक दिवस पीडितेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी नराधमाने पीडित मुलीला सदरील प्रकार आई-वडिलांना सांगितला तर ठार मारीन, अशी धमकी दिली होती. दहा दिवस अत्याचार सहन केल्यानंतर तिचे पोट दुखू लागल्याने सदरील प्रकार उघडकीस आला आहे.
फेब्रुवारी महिन्यात आरोपी व त्याच्या पत्नीने पीडित मुलीच्या आईला भेटून मुलगा सांभाळण्यासाठी तुमच्या मुलीला पाठवा असे सांगितले. पीडित मुलीचे आई-वडील दोघेही दिवसभर कामानिमित्त बाहेर राहत असल्याने त्यांनीही मुलीला मुलगा सांभाळण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याची पत्नी गावी गेली असता याचा फायदा या नराधमाने घेतला.
पत्नी घरी नसल्याने आरोपीने त्याचा मुलगा सांभाळण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवरच हात टाकला. सदरील प्रकार आईवडिलांना सांगितला तर ठार मारीन, अशी धमकी देत त्या नराधमाने अनेक दिवस त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. काही दिवसांनी पीडित मुलीचे पोट दुखू लागले असता तिने सदरील बाब तिच्या पालकांना सांगितली. त्यावेळी ती गर्भवती असल्याची बाब मुलीच्या पालकांच्या निदर्शनास आली.
मुलीच्या आई-वडिलांनी आरोपी व त्याच्या पत्नीला जाब विचारला असता त्याच्या पत्नीने पतीकडून झालेली चूक मान्य करत पीडित मुलीला शिरवणे गावातील एका खासगी डॉक्टरकडे नेले. त्या डॉक्टरकडून दोन इंजेक्शन व दोन गोळ्या दिल्या. त्यानंतरही पीडित मुलीचा गर्भ वाढतच गेला. त्यावर पीडित मुलीच्या पालकांनी नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी आरोपीला अटक केली.
या प्रकरणात त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल असून अद्याप तिला अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान आरोपीच्या पत्नीने पीडितेला कोणत्या डॉक्टरकडे नेले होते? तिच्यावर काय उपचार केले? तिला इंजेक्शन व गोळ्या कशासाठी दिल्या? यासह अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. नेरुळ पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली असून एक फरार आहे.
संबंधित बातम्या
हाथरसच्या मुलीवर बलात्कार झालाच नाही, यूपीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा दावा
(Minor girl raped in Navi Mumbai)