चेन्नई : जगाला हेवा वाटावा असं काम भारताची अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इस्रोने करुन दाखवलं आहे. भारताने मिशन चंद्रयान 2 चं (Chandrayaan-2) यशस्वी प्रक्षेपण केलं. 22 जुलै म्हणजे आज दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी सर्वात शक्तीशाली बाहुबली रॉकेट GSLV-MK3 च्या सहाय्याने चंद्रयान अवकाशात झेपावलं.
चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचण्यासाठी 48 दिवस लागणार आहेत. उड्डाणाच्या जवळपास 16.23 मिनिटांनी चंद्रयान 2 पृथ्वीपासून सुमारे 182 किमी उंचीवर GSLV-MK3 रॉकेटपासून वेगळं होऊन, पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावेल.
चंद्रयान 2 चा सर्व प्रवास यशस्वी झाल्यास, भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा जगातील एकमेव देश ठरेल. अद्याप कोणत्याही देशाने हे काम केलेलं नाही.
चंद्रयान 2 ची वैशिष्ट्ये
रॉकेट वुमेन
भारताच्या ऐतिहासिक चंद्रयान मोहिमेत ((Chandrayaan-2) ) 30 टक्के महिलांचा सहभाग होता. महत्त्वाचं म्हणजे दोन महिलांकडेही नेतृत्त्वाची धुरा देण्यात आली होती. प्रकल्प संचालक अर्थात प्रोजेक्ट डायरेक्टर मुथय्या वनिता (Muthayya Vanitha) या चंद्रयान-2 चं नेतृत्व करत होत्या, तर त्यांना भक्कमपणे साथ देत होत्या मोहिम संचालक अर्थात मिशन डायरेक्टर रितू करिधल (Ritu Karidhal).
श्वास रोखून धरायला लावणाऱ्या इस्रोच्या यापूर्वीच्या मोहिमांमध्ये कधीही महिलांनी नेतृत्त्व केलं नव्हतं. यंदा दोन महिलांनी नेतृत्त्वाची धुरा सांभाळली आणि ती यशस्वीही करुन दाखवली.
चंद्रयान 2 या मोहिमेतील प्रोजेट डायरेक्टर आणि मिशन डायरेक्टर ही दोन्ही महत्त्वाची पदं दोन्ही महिला सांभाळत होत्या. मुथय्या वनिथा या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहेत. चंद्रयान 2 मोहिमेचं यश असो की अपयश जे काही असेल ते यांच्याच वाट्याचं असेल.
तर मिशन डायरेक्टर रितू करिधल यांनी मंगळ मोहिमेदरम्यान डेप्युटी डायरेक्टर अर्थात उपसंचालक म्हणून जबाबदारी पार पाडली होती.
गेल्या दोन दशकांपासून या दोन्ही रॉकेट वुमेन इस्रोमध्ये कार्यरत आहेत. याआधी इस्रोने फतेह केलेल्या अनेक मोहिमांमध्ये या दोन्ही रॉकेट वुमेननी मोलाचा वाटा उचलला होता. आता चंद्रयान मोहिमेने त्यांच्या यशाला चार चाँद लावले आहेत.
संबंधित बातम्या
‘चंद्रयान-2’चं नेतृत्व करणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना अक्षय कुमारच्या शुभेच्छा
Mission Chandrayaan-2 : ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार?
Mission Chandrayaan-2 : मिशन ‘चंद्रयान 2’ फतेह, चंद्रयान अवकाशात झेपावलं