मुंबई : खिलाडीकुमार अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा मिशन मंगल (Mission Mangal) या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमार हा नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा करत असतो. सध्या तो त्याच्या आगामी ‘मिशन मंगल’मध्ये व्यस्त आहे. त्याच्या या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता. आज ‘मिशन मंगल’ चा ट्रेलर लाँच झाला. अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर हा टीझर शेअर केला आहे.
अभिनेता अक्षय कुमार, अभेनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, अभिनेता शरमन जोशी अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘मिशन मंगल’ हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला प्रदर्शित होणार आहे. भारताच्या मंगळ ग्रहावर पोहोचण्याची कहाणी या सिनेमात दाखवण्यात आली आहे. याधी टीझरच्या सुरुवातीलाच हा सिनेमा एका वास्तविक घटनेवर आधारित असल्याचं स्पष्ट केलं होतं. सिनेमाचा ट्रेलर अत्यंत जबरदस्त आहे. यामध्ये भारताचा मंगळ ग्रहावर पोहोचण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
Yeh sirf ek kahaani nahi balki ek misaal hai uss namumkin sapne ki jise mumkin kiya India ne.#MissionMangalTrailer out now https://t.co/9nDaX29Jo5@taapsee @SonakshiSinha @vidya_balan @TheSharmanJoshi @menennithya @IamKirtiKulhari @Jaganshakti @foxstarhindi #HopeProductions @isro
— Akshay Kumar (@akshaykumar) July 18, 2019
‘मिशन मंगल’ या सिनेमाच्या ट्रेलरनंतर अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता चाहत्यांना 15 ऑगस्टची प्रतीक्षा आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवतो हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या