श्रीहरीकोटा : भारतीयांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. ज्या क्षणाची सर्व भारतीय वाट पाहात होते, ते ‘चंद्रयान-2’ अखेर यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेन झेपावले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) महत्त्वाकांशी मिशन ‘चंद्रयान-2’ चं (Mission Chandrayaan-2) चेन्नईच्या श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झालं. सोमवारी (22 जुलै) दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी ‘चंद्रयान-2’ ने अकाशात झेप घेतली. हा क्षण भारतीयांसाठी ऐतिहासिक क्षण ठरला. हे मिशन यशस्वी होताच भारत चंद्रावर जाणारा जगातील चौथा देश ठरेल.
Launch of Chandrayaan 2 by GSLV MkIII-M1 Vehicle https://t.co/P93BGn4wvT
— ISRO (@isro) July 22, 2019
‘चंद्रयान-2’ या मिशनला पूर्ण होण्यासाठी तब्बल 48 दिवसांचा कालावधी लागेल. हे ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उरतणार आहे. चंद्राच्या या भागाबाबत फार कमी माहिती उपलब्ध आहे. इस्रोच्या मते, ‘चांद्रयान-2’ हे चंद्राचं भौगोलिक वातावरण, खनिज तत्व, वायुमंडळाच्या बाहेरील आवरण आणि चंद्रावरील पाण्याची उपलब्धता याबाबतची माहिती मिळवणार आहे.
#GSLVMkIII-M1 successfully injects #Chandrayaan2 spacecraft into Earth Orbit
Here’s the view of #Chandrayaan2 separation#ISRO pic.twitter.com/GG3oDIxduG— ISRO (@isro) July 22, 2019
‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच का उतरणार?
या मिशन अंतर्गत ‘चंद्रयान-2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. यापूर्वी चंद्रावर यशस्वीपणे उतरलेले अमेरिका, रशिया आणि चीन या तिन्ही देशांनी चंद्राच्या या भागावर अजून पाऊल ठेवलेलं नाही. त्यामुळे चंद्राच्या या भागाबाबत जगाला अद्याप काहीही अगवत नाही. भारताच्या ‘चंद्रयान-1’ मिशनदरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ असल्याचा शोध लागला होता. तेव्हापासून चंद्राच्या या भागाकडे जगाचं लक्ष वळलं.
#ISRO#GSLVMkIII-M1 lifts-off from Sriharikota carrying #Chandrayaan2
Our updates will continue. pic.twitter.com/oNQo3LB38S
— ISRO (@isro) July 22, 2019
भारत यंदाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ ‘चंद्रयान-2’चं लॅडिंग करणार आहे. या मोहिमेनंतर भारत जगावर आपलं वर्चस्व स्थापित करेल. इतकंच नाही तर या मोहिमेअंतर्गत भारत असा खजिन्याचा शोध लावू शकतो ज्यामुळे जवळपास पुढच्या 500 वर्षांपर्यंत मानवी ऊर्जेची गरज भासणार नाही. तसेच, यामुळे अब्जावधीची कमाईही होऊ शकते. चंद्रावरुन मिळणारी ही ऊर्जा सुरक्षि असेल, तसेच यामुळे पृथ्वीवर तेल, कोळसा आणि अणू यांमुळे होणारं प्रदुषणापासूनही सुटका होईल.
चंद्रावरील दक्षिण ध्रुव कसं असेल?
चंद्राचा दक्षिण ध्रुव हा अतिशय गुढ आहे. कारण, चंद्राच्या या दक्षिण ध्रुवाच्या जमिनीचा मोठा भाग हा उत्तर ध्रुवाच्या तुलनेत अधिक काळ लपलेला असतो. त्यामुळे या भागात पाणी असण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर थंडे क्रेटर्समध्ये (खड्डे) खनिजं असल्याचं संशोधनात आढळलं होतं. चंद्रयान-2 हे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरच्या मदतीने येथे आढळलेल्या मंजिनस सी आणि सिमपेलियस एन या क्रेटर्सच्या मध्यभागी असलेल्या जमिनीवर जवळपास 70° दक्षिण अक्षांशवर यशस्वीरित्या उतरण्याचा प्रयत्न करेल.
मिशन ‘चंद्रयान-2’ वैशिष्ट्ये
‘चंद्रयान-2’ पूर्णपणे भारतीय बनावटीचं, बाहुबली रॉकेटने यशस्वी उड्डाण
मिशन ‘चंद्रयान-2’ मोहीम दोन महिला शास्त्रज्ञांच्या नेतृत्त्वात यशस्वी
दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचण्यासाठी 48 दिवस लागणार
3,844 लाख किमीचं अंतर कापून भारताचं ‘चंद्रयान-2’ चंद्रावर पोहोचणार
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत एकमेव देश ठरणार
दक्षिण ध्रुवावरील रहस्य उलगडणार, चंद्रावरील पाणी, खनिजांचा शोध
VIDEO :