पुणे : पुणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अँड्रॉईड मोबाईल दान देण्याचं आवाहन केलं आहे. जुना अँड्रॉइड मोबाईल, टीव्ही, टॅब आणि कम्प्युटर देण्याचं आवाहन केलं आहे. 15 जुलैपासून पुण्यातील झेडपीच्या शाळांत ऑनलाईन शिक्षण सुरु होणार आहे. (Mobile and Digital Equipment’s donation program)
झेडपीच्या शाळेत दोन लाख 32 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र एक लाख 32 हजार कुटुंबियांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध आहेत. तर एक लाख विद्यार्थ्यांकडे कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात आला आहे. झेडपीचे सीईओ आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
त्याचबरोबर जिल्ह्यातील नेटवर्क नसलेल्या दुर्गम भागात वायफाय सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. नेटवर्क नसलेल्या 35 ग्रामपंचायत परिसरात जवळपास हजार विद्यार्थी आहेत. भोर वेल्हा, आंबेगाव आणि जुन्नर या चार तालुक्यात दुर्गम भागात नेटवर्कची अडचण आहे. त्यामुळे अशा ठिकाणी भारत नेट डिपार्टमेंट ऑफ आयटी मार्फत इंटरनेट उपलब्ध करून दिला जाणार आहे. वाय-फाय राऊटर माध्यमातून गावात विद्यार्थ्यांना वाय-फाय दिले जाणार आहे.
(Mobile and Digital Equipment’s donation program)
विद्यार्थ्यांच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये डेव्हलप केलेले ॲप डाऊनलोड करता येईल. डिजीटल टेक्स्टबुक विकसित केलं आहे. त्यामुळं कोणताही विद्यार्थी मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून प्रोफाईल तयार करू शकतो. एका वर्षाचा अभ्यासक्रम तीस आठवड्यात विभागून विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.
सुप्रिया सुळे यांचं आवाहन
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करुन या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचं आवाहन केलं आहे. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक उपकरणाअभावी शिक्षण घेणे अवघड होत आहे, त्यामुळे दानशूरांनी सुस्थितीतील उपकरणे दान करावी, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत.परंतु ऑनलाईन शिक्षण सुरु आहे.परंतु ग्रामिण भागातील अनेक विद्यार्थ्यांना अँड्राईड फोन,स्मार्ट टिव्ही,टॅब, लॅपटॉप, कंम्प्युटर अशा साधनांच्या अभावी शिक्षण घेणे अवघड झाले आहे. pic.twitter.com/FFK9hVDyBR
— Supriya Sule (@supriya_sule) July 5, 2020
हे लक्षात घेऊन @PuneZp ने समाजातील दानशूर व्यक्तींना आपले सुस्थितीतील जुने मोबाईल, टॅब, लॅपटॉप, कंम्प्युटर, स्मार्ट टिव्ही अशा वस्तू या विद्यार्थ्यांना दान करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय शक्य असल्यास या सर्व वस्तू नव्याही घेऊन देता येतील.
— Supriya Sule (@supriya_sule) July 5, 2020
संबंधित बातम्या
Online Schools | राज्यात ऑनलाईन शाळांना आजपासून सुरुवात | पुणे, नागपुरात ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात