मुंबई : गोव्याच्या किनाऱ्यावर आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे विरोधात कारवाई केली होती. त्यानंतर पूनम पांडे (Poonam Pandey) चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा पूनम एका नव्या बातमीमुळे प्रकाश झोतात आली आहे. डॉक्टर वरखा प्रभुगावकर यांनी पूनम 6 आठवड्यांची गर्भवती असल्याचे म्हटले होते. यानंतर पूनम आई होणार (Pregnancy News) असल्याची बरीच चर्चा रंगली होती. मात्र, आता खुद्द पूनमने यावर प्रतिक्रिया दिली आहे (Model Poonam Pandey Reacted On Pregnancy News).
आपण आई होणार असल्याचे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे पूनम पांडेने म्हटले आहे. ‘मी आता गर्भवती नसून, जेव्हा ही आनंदाची बातमी येईल, तेव्हा सगळ्यांसोबत नक्की शेअर करेन’, असे पूनम पांडे म्हणाली. सध्या गोव्यात असणाऱ्या पूनम पांडेने एका प्रसिद्ध वेबसाईटला मुलाखत दिली होती.
अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे (Sam Bomabay) यांना 6 नोव्हेंबर रोजी गोवा पोलिसांनी अटक केली होती. चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रीत करण्याच्या आरोपावरून कॅनकोना येथून त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणात दोघांनाही जामीन मिळाला होता. पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांना कॅनकोना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासने 6 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता जामीन मंजूर केला होता (Model Poonam Pandey Reacted On Pregnancy News).
कॅनकोना पोलिस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे कुनोलिम पीआय थेरॉन डी कोस्टा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जामीन मिळाला असला तरी, पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे पोलिसांच्या परवानगीशिवाय गोवा सोडू शकत नाहीत. दोघांनाही पुढचे काही दिवस पोलीस ठाण्यात येऊन दररोज हजेरी लावावी लागणार आहे.’
Actor Poonam Pandey and her husband arrested in a case related to the circulation of an alleged obscene video; further investigation is in progress: SP South, Goa
— ANI (@ANI) November 5, 2020
पूनम आणि सॅमसह, एक कॉन्स्टेबल आणि कॅनकोना पोलीस ठाण्याचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. हे दोन्ही पोलीस कर्मचारी चापोली धरणावर व्हिडीओ चित्रीकरणादरम्यान उपस्थित होते. याशिवाय जलसंपदा विभागाने चापोली धरणावर तैनात असलेल्या सहा कर्मचाऱ्यांना देखील निलंबित केले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.
गोव्यातील चापोली धरणावर आक्षेपार्ह व्हिडीओचे चित्रीकरण केल्याने पूनम पांडे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या महिला शाखेने पूनम पांडे विरोधात गोव्यातील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
(Model Poonam Pandey Reacted On Pregnancy News)