मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईच्या ‘नॅशनल म्युजिअम ऑफ इंडिअन सिनेमा’चे उद्घाटन केले. यावेळी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी येथे उपस्थित होते. अनेकांनी पंतप्रधानांसोबत सेल्फीही घेतला. अभिनेता कार्तिक आर्यन हादेखील या कार्यक्रमाला उपस्थित होता. यावेळी त्यानेही मोदींसोबत सेल्फी घेतला, मात्र या सेल्फीत मोदींची पाठ दिसते आहे. कार्तिक आणि दिग्दर्शक करण जोहर, दिनेश विजान, इम्तियाज अली यांनी मोदींसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला, ज्यात मोदी हे त्यांच्याकडे पाठ फिरवून उभे असल्याचं दिसत आहे. कारण हा सेल्फी मोदींच्या मागून घेण्यात आला.
हा सेल्फी कार्तिकने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत लिहिले की, “आदरणीय पंतप्रधानांसोबत लुझर्सचा बॅकफी”
Losers’ backfie with the
Honorable PM! ?#ImtiazAli @karanjohar #Dineshvijjan pic.twitter.com/Cl9yYSf2Hc— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) January 19, 2019
कार्तिकच्या या ट्विटवर मोदींनी रिट्वीट करत लिहिले की, “लुझर्स नाही तुम्ही रॉकस्टार्स आहात! आपली भेट झाली तेव्हा सेल्फी घेऊ शकलो नाही, पण पुढे असे अनेक प्रसंग येतील.”
Not losers but Rockstars!
No selfie Jab We Met but there will always be another occasion. 🙂 https://t.co/1Ud7D5jIvd
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2019
या ट्विटमध्ये मोदींनी शब्दांचा उत्कृष्ट वापर केलेला दिसतो. पंतप्रधानांनी यात वापरलेले ‘रॉकस्टार’ आणि ‘जब वी मेट’ हे दिग्दर्शक इम्तियाज अलीचे सिनेमे आहेत. त्यामुळे पंतप्रधानांनी इम्तियाज अलीला दिलेलं उत्तर सृजनशील म्हणावं लागेल.
मोदींसोबतचा हा फोटो इम्तियाज अलीनेही त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
या उद्घाटनावेळी घेतलेले काही फोटोही मोदींनी शेअर केले. यामध्ये गायिका आशा भोसले, अभिनेते जितेंद्र, आमीर खान, मनोज कुमार इत्यादींसोबत पंतप्रधान मोदी दिसत आहेत. तसेच मोदींनी लोकांना या संग्रहालयाला भेट देण्याचं आवाहनही केलं.
देशातील या एकमेव अशा सिनेमा संग्रहालयाला बनवण्यासाठी 141 कोटींचा खर्च आला. याला नॅशनल काऊन्सिल ऑफ सायन्स म्युजियमने तयार केले आहे. या संग्रहालयाला 19 व्या शतकातील गुलशन महालाच्या आत स्थापित करण्यात आले आहे. इथे भारतीय सिनेमाच्या मागील 100 वर्षांचा सुवर्णकाळ दाखवण्यात आला आहे.