नवी दिल्ली : उन्हाळ्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रासाठी गुड न्यूज (Monsoon Entered In Kerala) आहे. मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला होता त्याआधीच मान्सून केरळात दाखल झाला आहे. तर मुंबईत येत्या 2 ते 4 जूनदरम्यान मान्सूनची एन्ट्री होण्याची शक्यता आहे, असं हवामानाविषयी माहिती देणाऱ्या खासगी एजन्सी स्कायमेटने सांगितलं (Monsoon Entered In Kerala).
भारतीय हवमान विभागाने (IMD) 1 जूनला मान्सून केरळात दाखल होणार असल्याचं भाकित वर्तवलं होतं. मात्र, बंगालच्या खाडीतील सुपर सायक्लोन अम्फाननंतरही मान्सूनने केरळात दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 30 मे रोजी आगमन केलं आहे. मान्सूनपूर्वीच केरळात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसला.
#JUSTIN Southwest #Monsoon2020 finally arrived on the mainland of India, #Monsoon arrived on Kerala before the actual onset date. All the onset conditions including rainfall, OLR value, wind speed, etc are met. Finally, the 4-month long festival begins for Indian. #HappyMonsoon
— SkymetWeather (@SkymetWeather) May 30, 2020
2 ते 4 जूनदरम्यान पाऊस मुंबईत
मान्सूनने केरळात एन्ट्री केली आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवर कर्नाटक ते गोवा आणि मुंबईपर्यंत पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये 2 ते 4 जूनदरम्यान पावसाची शक्यता आहे (Monsoon Entered In Kerala). 3 जूनला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान कोकण, गोव्याच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
यावर्षी मान्सून सरासरी राहणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली होती. त्यानुसार, यंदाच्या वर्षी 96 ते 100 टक्के पाऊस पडण्याचे भाकित वर्तवण्यात आले आहे. गेल्या वर्षी मान्सून 8 जून रोजी केरळात दाखल झाला होता(Monsoon Entered In Kerala).
संबंधित बातम्या :
कोरोनाचा फटका, मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा वेग मंदावला
Monsoon | मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, राज्यात कुठे-कधी पावसाची शक्यता?