नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने अर्थात आयएमडीने (India Meteorological Department) शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे. यंदा मान्सून सामान्य राहील अशी माहिती हवामान खात्याने दिली. सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला हा पहिला अंदाज आहे. भारतात 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं.
सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता – 39 टक्के, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता – 10 टक्के, अतिवृष्टी होण्याची शक्यता – 2 टक्के सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता – 33 टक्के आणि अत्यंत कमी (टंचाईसदृश परिस्थिती) पावसाची शक्यता – 17 टक्के वर्तवण्यात आली आहे.
IMD ने अल निनोच्या प्रभाव राहणार नाही, त्यामुळे सामन्य मान्सूला पोषक वातावरण असेल, असं आयएमडीने म्हटलं आहे. दरम्यान, आयएमडी आपला पुढील अंदाज जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणार आहे.
त्याआधी फेब्रुवारी महिन्यात स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनेही मान्सून सामान्य राहील असं म्हटलं होतं. इतकंच नाही तर यंदा दुष्काळाची शक्यता अत्यंत कमी आहे. तसंच पावसाचे हुकमी महिने जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, अशी शक्यता 50 टक्क्यांहून जास्त आहे, अशी शक्यता स्कायमेटने वर्तवली होती.
भारतात 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं. गेल्या वर्षी 2018 मध्ये जुलै, सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी 91 टक्के होती. हवामान विभागाने 97 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे अनेक भागात दुष्काळाचं चित्र आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तर हे भयाण चित्र पाहायला मिळतं.
संबंधित बातम्या
स्कायमेटची खुशखबर, यंदा मान्सून सामान्य राहणार!