मुंबई : रॉयल एनफिल्डने गेल्या महिन्यात मीटिओर 350 (Royal Enfield Meteor 350) ही बाईक लाँच केली होती. Meteor रेंज ही नव्या इंजिनासह विकसित करण्यात आली आहे. नवीन मीटिओर 350 एका ग्लोबल प्रोडक्टच्या रुपात सादर करण्यात आली आहे. तीन व्हेरिएंट्ससह (फायरबॉल, स्टॅलर आणि सुपरनोव्हा) लाँच करण्यात आलेली Royal Enfield Meteor 350 बाईक थंडरबर्ड 350X ला रिप्लेस करत आहे. दरम्यान या बाईकला देशभरातील बाईकप्रेमींकडून चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
लाँचिंगनंतर अवघ्या एका महिन्यात या बाईकच्या 7 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. हे आकडे नोव्हेंबर महिन्यातील आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये क्लासिक 350 च्या 39 हजार युनिट्सची विक्री झाली आहे. त्यानंतर मीटियर 350 चा नंबर लागतो. Meteor ने मंथली सेलमध्ये Royal Enfield Bullet 350 आणि Royal Enfield Electra 350 ला मागे टाकले आहे.
कशी आहे Royal Enfield Meteor 350?
Meteor 350 मध्ये नवीन डिव्हाइस कन्सोल सेट-अप आणि स्प्लिट सीट डिजाइन देण्यात आली आहे. हेडलाईट आणि टेललाईटमध्येही बदल करण्यात आले आहेत. डिझाईनच्या बाबतीत या बाईकमध्ये टियर-ड्रॉप शेप्ड इंधन टॅन्क, ब्राईट कलर ऑप्शन, एलईडी लाईट आणि एका स्प्लिट-सीटचा समावेश करण्यात आला आहे.
इंजिन
नव्या मीटिओर 350 मध्ये एक नवीन फ्रेम आणि नवीन इंजिन देण्यात आलं आहे. मीटिओर 350 मध्ये डबल-क्रॅडल चेसिसचा वापर करण्यात आला आहे. असं सांगितलं जातंय की, नवीन 350 सीसी इंजिन पूर्वीपेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करेल. या बाईकचं इंजिन 20.2 बीएचपी आणि 27 एनएम पीक टॉर्क निर्माण करु शकतं.
इतर फिचर्स
मीटिओरला एक मीडियम टीएफटी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत मेन यूनिट जे ट्रिप मीटर आणि इतर डिटेल्ससाठी अॅनालॉग स्पीडोमीटर एलईडी पॅनलसह आहे. Meteor 350 मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल अॅनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि नवीन टीएफटी डिस्प्लेमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सुविधा आहे.
किंमत
RE Meteor 350 ची किंमत 1.5 लाख ते 2 लाख रुपये इतकी आहे. Benelli Imperiale 400, Jawa 300 आणि नुकत्याच लाँच झालेल्या Honda H’Ness CB350 या गाड्यांना RE Meteor 350 टक्कर देत आहे.