राज्य सरकारची 2 लाख पदे रिक्त, महाविकास आघाडी मेगाभरती करणार?

| Updated on: Mar 09, 2020 | 5:34 PM

राज्यात 70 हजार पदांची भरती होणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारने (Maharashtra Government Job vacancy) सांगितले.

राज्य सरकारची 2 लाख पदे रिक्त, महाविकास आघाडी मेगाभरती करणार?
Follow us on

पुणे : राज्यात 70 हजार पदांची भरती होणार असल्याचे महाविकास आघाडी सरकारने (Maharashtra Government Job vacancy) सांगितले. पण प्रत्यक्षात राज्यात जिल्हा परिषद आणि शासकीय खात्यांमध्ये मिळून आतापर्यंत तब्बल 2 लाख 193 पदे रिक्त आहेत. माहित अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती (Maharashtra Government Job vacancy) मिळवली आहे.

नितीन यादव यांनी शासनाकडे सर्व विभागांमध्ये मिळून 31 डिसेंबर 2019 अखेर मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची संख्या मागवली होती. 17 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांनी माहिती अधिकाराचा अर्ज ऑनलाईन दाखल केला होता. त्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाने आज (9 मार्च) नितीन यादव यांना दिली. यामध्ये 1 जानेवारी 2020 पासून भरलेल्या पदांच्या संख्येचा समावेश नाही. पण एकूणच शासनाच्या प्रत्येक कार्यालयात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत हे स्पष्ट झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांना राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंजूर असलेल्या शासकीय पदांपैकी एक लाख 41 हजार 329 पदे ही सरळसेवा भरतीतील पदे आहेत, जी रिक्त आहेत. तर पदोन्नतीतून भरली जाणाऱ्या पदांची संख्या तब्बल 58 हजार 864 एवढी आहे. सध्या सरळसेवा भरतीतूनच शासनाला दीड लाख पदांची आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या काळात ही पदे भरली जाणार का याची उत्सुकता आहे.

कोणत्या विभागात किती रिक्त पदे

गृह खात्यात 28 हजार, आरोग्य 20 हजार 594, जलसंपदा 20 हजार 873, कृषी विभागात 14 हजार, महसूल विभागात 12 हजार, तर शालेय शिक्षण आणि क्रिडा विभागात 5 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागात 8 हजार 628 पदे रिक्त आहेत.

दरम्यान, एकिकडे सरकारकडून 70 हजार पदांची भरत होणार सांगितले जात आहे, तर दुसरीकडे मात्र दोन लाखांपेक्षा अधिक पदे राज्यात रिक्त आहे. त्यामुळे उर्वरीत पदे कधी भरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबधित बातम्या : 

एकीकडे लाखो बेरोजगार, दुसरीकडे शिक्षक नाही, सरकारची मेगा भरती कधी?

एसटी महामंडळात मेगाभरती, मराठा आरक्षणाचीही अंमलबजावणी

खुशखबर… रेल्वेत 14,033 जागांची मेगाभरती