वाशिम : आईनेच पोटच्या तीन वर्षीय मुलीला गळफास देऊन तिची हत्या (Mother killed three years daughter) केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. ही घटना वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यातील जनुना गावात घडली. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतलं असून तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गायत्री भगत असं या आईचं (Mother killed three years daughter) नाव आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील जनुना गावात अमोल भगत आणि गायत्री भगत हे दाम्पत्य राहत होते. या दाम्पत्याला समीक्षा भगत (8), तनीक्षा भगत (3) आणि प्रांजली भगत (2) अशा तीन मुली आहेत. आज (7 जानेवारी) जिल्हा परिषेदेसाठी मतदान होते त्यामुळे गायत्रीचा पती अमोल हा मतदानसाठी जात असताना त्यानं गायत्रीला स्वयंपाकाविषयी विचारलं होतं. स्वयंपाकबद्दल विचारल्याने गायत्रीला राग आला तिनेही राग मनात ठेवून तीन वर्षाच्या तनीक्षाला घेऊन मतदान करायला जाते असं सांगत घराबाहेर पडली.
गायत्री आपल्या लहान मुलीला घेऊन गावाबाहेर गेली. तिथे तिने तनीक्षाला झाडाला लटकवून गळफास दिला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण या दरम्यान गावकऱ्यांनी धावत येऊन तिला वाचवले.
गायत्रीने नेमकं कोणत्या कारणामुळे आपल्या मुलीचा जीव घेतला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पण पतीनं विचारलं म्हणून या महिलेनं आपल्या मुलीला गळफास देऊन तिची हत्या केल्याने आई मुलीच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे.