‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
आता धनश्री लवकरच आई होणार आहे. त्यामुळे धनश्री सेल्फ टाईम स्पेन्ड करताना दिसत आहे. सोबतच ती नवनवीन फोटोशूटसुद्धा करते.
आता धनश्रीनं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. गुलाबी रंगाच्या या ड्रेसमध्ये ती अजूनच सुंदर दिसतेय.
'Little Mister ? Or Little sister ?' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.