मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरात कोरोनाबाधित रुग्णाची (Mumbai Corona Patient Murder Case) हत्या करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे हत्येच्या पाच दिवसांनी या रुग्णाचा मृतदेह राजावाडी रुग्णालयातून गायब झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला (Mumbai Corona Patient Murder Case) आहे.
गोवंडीतील शिवाजी नगर येथे राहणाऱ्या या व्यक्तीवर 3 जून रोजी चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर या व्यक्तीला तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ज्यावेळी या व्यक्तीला जखमी अवस्थेत रुग्णालयात आणलं, तेव्हा तो जिवंत होता. मात्र, काहीच वेळात वेळात त्याचा मृत्यू झाला.
या व्यक्तीची जोपर्यंत कोरोनाची टेस्ट होत नाही, तोपर्यंत त्याचं शवविच्छेदन करण्यात येणार नाही, अशी भूमिका राजावाडी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागाच्या डॉक्टरांनी घेतली (Mumbai Corona Patient Murder Case ). त्यामुळे 3 जून रोजी मृत व्यक्तीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. तोपर्यंत मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला.
मात्र, आज (8 जून) त्या व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल आला. तो कोरोना पॉझिटिव्ह होता. त्यामुळे या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णालयाचे कर्मचारी मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेले. तेव्हा, या व्यक्तीचा मृतदेह गायब असल्याचं कळालं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतदेहाचा शोध सुरु आहे. ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने चिंता वाढली आहे.
After KEM hospital now another Dead Body disappear from Rajawadi Hospital Ghatkopar. On 3 June a person with KNIFE Wound from Deonar brought to Rajawadi, died in Casualty. Body kept in Morgue. Yesterday after receiving Corona Report DeadBody was to b removed. But it was GAYAB!!? pic.twitter.com/t6V7WzOZPh
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 8, 2020
Mumbai Corona Patient Murder Case
संबंधित बातम्या :
एकाच कुटुंबातील चौघांच्या खात्यातून साडेसात लाख लंपास, नागपुरात सायबर चोरांमुळे डोकेदुखी
Nagpur Crime | नागपुरात कुख्यात गुंड बाल्या वंजारीचा खून, जिल्ह्यात 11 दिवसात 11 खून
नवी मुंबईत भररस्त्यात बिल्डरला गोळ्या घातल्या, डोक्यात गोळी मारल्याने जागीच मृत्यू
एकीकडे कोरोनाचा कहर, दुसरीकडे गुन्हेगारांचा उच्छाद, नागपुरात 24 तासात 3 खून