मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणाऱ्या पावसाने मुंबईत जोरदार हजेरी (Mumbai Maharashtra Rain Live Update) लावली. दुपारनंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यासारख्या कोकण किनारपट्टी भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आज आणि उद्या मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुंबईत लोअर परळ, वरळी, दादर, माटुंगा, किंग्ज सर्कल या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळत आहेत. तर उपनगरात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
Heavy rainfall is likely to occur at isolated places in Mumbai, Thane, Raigad & Palghar districts of Maharashtra today and heavy to very heavy rainfall at a few places in the districts tomorrow: India Meteorological Centre, Mumbai
— ANI (@ANI) July 14, 2020
तर कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्गात सकाळपासूनच पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे. (Mumbai Maharashtra Rain Live Update)
सिंधुदुर्गात आतापर्यंत 391 मिमी पाऊस झाला. तर मालवण तालुक्यात सर्वाधिक 112 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. यानुसार 15 ते 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने (Mumbai Maharashtra Rain Live Update) दिला आहे.
संबंधित बातम्या :
Pune traffic jam | पुणे वाहतूक कोंडीचे टॉप अँगल फोटो
Mumbai Rains | मुंबईत पावसाची दमदार हजेरी, पुण्यातही मुसळधार पावसाची शक्यता