मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला (Mahim Gun Fire During Lockdown) आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र या दरम्यान गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाल्याचे दिसत आहे. मुंबईत लॉकडाऊनदरम्यान गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गोळीबार झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री 9 च्या सुमारास (Mahim Gun Fire During Lockdown) गोळीबार झाल्याची घटना घडली. माहिमच्या वीर सावरकर मार्गावर जैतून कपांऊड या ठिकाणी ही घटना घडली. यावेळी रिझवान बेग या व्यक्तीने आसिफ नावाच्या एका व्यक्तीवर गोळीबार केला. रिझवान बेग हा माहिम दर्गा ट्रस्टी सोहील खंडवाणीचा निकटवर्तीय आहे.
या गोळीबारानंतर पोलिसांनी वीर सावरकर मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसेच घटनास्थळी पंचनामा सुरु आहे.
हा गोळीबार वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मुंबईत लॉकडाऊनमध्ये दुहेरी हत्याकांड
तर दुसरीकडे मुंबईत लॉकडाऊन असतानाही दुहेरी हत्याकांड घडलं. शिवडीमध्ये दोघा सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. मुंबईच्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. मैदानात बसणे आणि बाईक पार्किंगच्या वादातून सोमवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे.
लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर असलेल्या मैदानात बसलेल्या मुलांवर चॉपरने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांपैकी एक मुलगा अल्पवयीन असल्याची माहिती (Mahim Gun Fire During Lockdown) आहे.
संबंधित बातम्या :
ग्रामविकास विभागात 28 हजार जागांच्या नोकरभरतीची खोटी जाहिरात, पुण्यात बोगस वेबसाईटवर गुन्हा
Lockdown : दारुबंदी असलेल्या वर्ध्यात नदीपात्रात दारुनिर्मिती, 7 लाखांचे दारुचे साहित्य नष्ट