Mumbai Lockdown | बोगस प्रवासी पास बनवून देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, एकाला अटक

| Updated on: May 28, 2020 | 5:43 PM

बोगस प्रवासी पास बनवून देणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. हे आरोपी मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी बोगस पास बनवून द्यायचे.

Mumbai Lockdown | बोगस प्रवासी पास बनवून देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड, एकाला अटक
Follow us on

मुंबई : बोगस प्रवासी पास बनवून देणाऱ्या (Bogus Pass) रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. हे आरोपी मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी बोगस पास बनवून द्यायचे. याप्रकरणी डोंगरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. तर एकजण फरार आहे. पोलीस त्याचा शोध (Bogus Pass) घेत आहेत.

गुन्हेगार गुन्ह्यासाठी कोणती शक्कल लढवेल सांगता येत नाही. सध्या लॉक डाऊन (Corona Lockdown) आहे. लोकांना मुंबई बाहेर महाराष्ट्र अथवा महाराष्ट्राबाहेर जाता येत नाही. ज्यांच्याकडे योग्य करण आहे, त्याच व्यक्तीला पोलीस पास देत असतात. त्या पासवर अर्जदार व्यक्ती आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतो. मात्र, आता याच संधीचा फायदा घेऊन काही व्यक्तींनी बोगस पास बनवून द्यायला सुरुवात केली आहे. मात्र, ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच या रॅकेटचा भांडफोड करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांना काही महत्वाची माहिती मिळाली होती. या माहितीवर कारवाई करण्याची जबाबदारी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांच्यावर सोपवण्यात आली होती (Bogus Pass). यानंतर निशानदार यांनी याबाबत तपास करण्यासाठी एक टीम बनवली.

या टीमने चौकशी करुन डोंगरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. त्यानंतर मनोज हुंबे या व्यक्तीला अटक केली. मनोज हुंबे आणि त्याचा साथीदार हे बोगस पास बनवायचे. एका पासचे 5 हजार रुपये घायचे. त्यातले 3 हजार रुपये मनोज घायचा. सध्या यातील एक व्यक्ती फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Bogus Pass

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे मलाही सोडलंय, नागपूर जेलमधून पळून गेलेला कैदी दिल्लीत बहिणीच्या घरी सापडला

चादरीने शौचालयात गळफास, तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या

दारु पिण्यावरुन वाद, वडिलांनी पोटच्या मुलाचा गळा आवळला, मृतदेह दोन दिवस घरातच

तीन महिन्यांच्या बाळाच्या हत्येची तक्रार, आईच निघाली खुनी