मुंबई : मुंबईतील मालाडच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एका 21 वर्षीय तरुणीशी छे़डछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विरोधात दोघांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. (Women Molestation in Mumbai Quarantine center)
नेमकं प्रकरण काय?
मालाडच्या जनकल्याणनगरमधील न्यू भूमी पार्कच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये 15 जूनला एका 21 वर्षीय तरुणीसोबत छे़डछाड केल्याची घटना घडली. या पीडित तरुणीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगत तिला क्वारंटाईन सेंटरमध्ये बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर तरुणीला तुझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आला आहे. उद्या तुला घरी सोडण्यात येईल, असा सांगण्यात आले.
मात्र त्यादिवशी क्वारंटाईन सेंटरमध्ये तिच्या रुममध्ये ती एकटी असताना तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. या पीडित तरुणीने आरडाओरड केल्यानंतर आरोपीने पळ काढला.
दुसऱ्या दिवशी तरुणीचे कुटुंब तिला घरी घेऊन गेले. त्यानंतर या महिलेने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर 20 जूनला पीडित तरुणीने आणि तिच्या आईने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा नोंदवला.
यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी पालिकेचा कर्मचारी नसून खासगी कंत्राटी तत्वावर या क्वारंटाईन सेंटरमध्ये काम पाहत होता. यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाकडून त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान चारकोप विधानसभा क्षेत्रातील मनसे विभागप्रमुख दिनेश साळवी यांनी या घटनेनंतर पालिकेला एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटर खासगी कंत्राटदरावर दिले असतील ते त्वरित रद्द करावेत. तसेच प्रत्येक क्वारंटाईन सेंटरवर एका महिला कर्मचारी असावी, जेणेकरुन हे प्रकार पुन्हा घडणार नाही, असे त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. (Women Molestation in Mumbai Quarantine center)
Maharashtra Corona Update | दिवसभरात 1,962 रुग्ण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 1 लाख 35 हजार 796 वरhttps://t.co/l072IErGfZ@rajeshtope11 #CoronaUpdates #CoronaInMaharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2020
संबंधित बातम्या :
वंदे भारत मिशन, जगभरातील 16 हजारांहून अधिक नागरिक मुंबईत दाखल, आणखी 49 विमानं भरुन येणार