NCP MLA Disqualification Row | शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लोंगकुमे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांविरोधात दाखल केलेली अपात्रतेची याचिका फेटाळून लावली आहे. शदप पवार यांच्या नेतृत्वाखालील NCPचे राष्ट्रीय महासचिन हेमंत टकले यांनी 30 ऑगस्ट 2023 रोजी सात आमदार – पिक्टो शोहे, पी. लॉन्गॉन, नम्री नचांग, वाय. म्होनबेमो हमत्सो, तोइहो येप्थो, वाय मानखाओ कोन्याक आणि ए पोंगशी फोम यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती.
अखेर नागालँडच्या विधासभा अध्यक्षांनी ही याचिका फेटाळली आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोपवत नेते म्हणून मान्यता दिली, त्या निर्णयाच्या आधारे नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लोंगकुमे यांनी हा निर्णय घेतला.
सात आमदारांनी दिला होता पाठिंबा
एनसीपीत्या सात आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने पाठिंबा देणारे पत्र दिले होते. ज्या आमदारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यांना अजित पवार यांनी पाठिंबा दर्शवला होता. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर भारतीय निवडणूक आयोग अंतिम निर्णय घेईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, अशी प्रार्थना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून 30 ऑगस्ट रोजी सभापतींना करण्यात आली होती.
यासंदर्भात शुक्रवारी निर्णय जाहीर करताना लोंगकुमेर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित अपात्रतेची याचिका त्यांच्या न्यायालयात पाच महिन्यांहून अधिक काळापासून प्रलंबित आहे. लोंगकुमार यांनी दहाव्या अनुसूचीच्या पॅरा 2(1) A चा हवाला देऊन सांगितले की, सात आमदारांना अपात्र ठरवण्यात येणार नाही. राष्ट्रवादीतील निवडणूक चिन्हावरील वादावर निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला निर्णय दिला. तो राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँडचे अध्यक्ष वांथुंगो ओड्यू यांनी सभापती कार्यालयात उपलब्ध करून दिला. निवडणूक आयोगाचा निर्णय जर बघितला तर आमदारांविरुद्धची ही तक्रार आता राहिली नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवले जाणार नाही. असे सांगत त्यांनी ही याचिका फेटाळून लावली.
काय आहे प्रकरण ?
नागालँड विधानसभेत शरद पवार यांच्या नेतृ्तवाखाली सात आमदारांविरोधात तक्रार दाखल केली होती. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हेमंत टेकले यांनी 30 ऑगस्ट 2023 रोजी सात आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली होती. त्या आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने समर्थनाची पत्रे दिली होती. हेमंत टकले यांनी सात आमदारांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला होता.