नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण पाहायला (Nagpur 13 Containment area free) मिळत आहे. तर दुसरीकडे 13 कोरोनाबाधित वस्त्यांमध्ये गेल्या 28 दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या परिसरातील प्रतिबंध हटवण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुढेंनी दिले आहे.
नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 747 पर्यंत गेला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे. तर दुसरीकडे नागपुरातील 13 कोरोनाबाधित वस्त्यांमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्याभरात या ठिकाणी एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या वस्त्या मोकळा श्वास घेत आहे. तसेच नवीन रुग्ण न आढळल्याने या 13 वस्त्यांमधील प्रतिबंध हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 14 मैल परिसरात काल नव्या 9 रुग्णांची भर पडली आहे. या भागातील एकूण रुग्णसंख्या 12 वर पोहोचली आहे. त्यामुळे 14 मैल हा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरातील 43 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या सर्वांची आरोग्य तपासणी सुरु आहे.
नागपूर जिल्ह्यात 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 747 वर पोहोचली आहे. तर सारी आजाराने पिडीत असलेल्या एका रुग्णाचा काल कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मृत्यूनंतर नागपुरात आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या 14 वर पोहोचली आहे.
तसेच काल 23 रुग्णांना नागपूरच्या कोव्हिड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 477 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला (Nagpur 13 Containment area free) आहे.
संबंधित बातम्या :
मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता?
जळगावच्या रुग्णालयातून 82 वर्षाची कोरोनाबाधित महिला बेपत्ता, आजींचा शोध सुरु