नागपूर : नागपुरातील हॉटस्पॉट मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच (Nagpur Corona New Hotspot) आता नवीन भागातही कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. नागपुरातील काही नवीन भाग आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. गड्डीगोदाम, नाईक तलाव, लोकमान्य नगर, टिमकी या भागात रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. आज नागपुरात नव्या 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 571 वर पोहोचला आहे.
नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाची चिंता (Nagpur Corona New Hotspot) वाढली आहे. तर दुसरीकडे नागपुरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. आज 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्याही 383 वर पोहोचली आहे. तर नागपुरात कोरोनामुळे 11 जणांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
नागपुरात कोरोनाचे नेमकी परिस्थिती काय?
नागपूर शहरात आता बऱ्यापैकी सूट मिळाल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसून येत आहे. अनेक व्यवहार सुद्धा सुरु झाले. नागपूरचं जनजीवन रुळावर येत असलं तरी वाढत असलेली रुग्णसंख्या बघता जनतेनेचे आपली सुरक्षा घेण्याची गरज आहे.
नागपुरात काय घडतयं?
संबंधित बातम्या :
Maharashtra Corona Update | राज्यात 2,361 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार
वर्ध्यातील 21 वर्षीय कोरोनामुक्त तरुणीचा मेंदूज्वराने मृत्यू