नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपुरात धडक कारवाई सुरु केली आहे. फेरीवाल्यांना सळो की पळो करुन सोडल्यानंतर, त्यांच्या धडक कारवाया सुरुच आहेत. या धसक्याने नागपूर परिवहन सेवेतील प्रशासन सतर्क झाले आहे. नागपूर शहरात तिकीट चोरीप्रकरणात तब्बल 22 कंडक्टरना (Nagpur Aapli bus conductors )बडतर्फ करण्यात आलं आहे. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने ही धडक कारवाई केली. (Nagpur Aapli bus conductors )
तिकीट चोरीच्या या प्रकरणात ‘आपली बस’च्या तब्बल 81 कंडक्टरचं आयडी लॉक करण्यात आलं आहे. शहरातील बस सेवेतील कंडक्टरच्या रॅकेटमुळे मनपाला दर महिन्याला सहा कोटीचा फटका बसतो. हा तोटा कमी करण्यासाठी आयुक्त मुंढे यांनी निर्देश दिले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कारवाया सुरु करण्यापूर्वीच परिवहन सभापतींनी थेट कारवाई सुरु केली.
‘आपली बस’ भरारी पथकाच्या कारवाईत प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट न दिल्याची बाब उघड झाली आहे. 81 कंडक्टरने प्रवाशांकडून पैसे घेतले पण तिकीटच दिलं नसल्याचं समोर आलं. याप्रकरणी आता कारवाई कुठपर्यंत जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.