नागपूर : चोरसुद्धा पगारी असतात हे ऐकून आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे, मात्र हे खरं आहे. नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी मोबाईल चोरांची आंतरराज्यीय टोळी पकडली असून त्यांच्याकडून जो खुलासा झाला आहे तो ऐकूण सर्वांनाच आश्चर्य वाटेल. या टोळीतील सर्व चोर पगारी आहेत. या टोळीचा प्रमुख बिहारमधून टोळी सांभाळतो आणि प्रत्येकाला त्याच्या कामानुसार पगार देतो. (Nagpur beltarodi police caught a gang of thieves working on salary)
नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी मोबाईल चोरांची टोळी पकडली आहे. त्यात एकूण चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत बिहार आणि झारखंडमधील चोरांचा समावेश आहे. हे चोर नागपुरात वेगवेगळ्या बाजारांच्या ठिकाणी मोबाईल आणि पर्स चोरतात त्यासाठी अल्पवयीन मुलांची मदत घेतात.
हे चोर वेगवेगळ्या बाजारात काही दिवस चोरी करतात आणि मग आपल्या राज्यात निघून जातात. त्यांचं राहण्याचं ठिकाण नसल्याने त्यांना शोधणे कठीण होते. मात्र नागपूर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर चोरांनी जे काही सांगितलं ते ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.
हे चोर चोरी करायचे मात्र ती त्यांची नोकरी होती, चोरी करण्याचा त्यांना पगार दिला जात होता. जो जास्त चोरी करेल त्याला त्याच्या कामासाठी पगाराव्यतिरिक्त कमिशनसुद्धा मिळते. प्रत्येकाला 10 ते 15 हजार रुपये पगार दिला जातो. त्यांना पगार देणारा म्होरक्या बिहारमधून टोळी सांभाळतो. पोलिसांनी या चोरांकडूंन वेगवेगळ्या ठिकाणी चोरलेले 5 महागडे मोबाईल हस्तगत केले आहेत.
संबंधित बातम्या
मुलाकडे तुझ्या प्रेम प्रकरणाचं बिंग फोडेन, सुनेला धमकावत सासऱ्याचा बलात्कार
बिहारमधून 7 वर्षीय मुलाचे अपहरण, खंडणीसाठी मुंबईतून फोन, चौघांना अटक
घराच्या वादातून दोन महिलांवर प्राणघातक हल्ला, महिलांच्या गुप्तांगावर बॅटने मारहाण, बीड हादरले
(Nagpur beltarodi police caught a gang of thieves working on salary)