नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या कामाच्या टाळाटाळीची चर्चा नेहमीच होत असते. सामान्य नागरिक नेहमीच या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी करतात. मात्र, यंत्रणांच्या ठिम्मपणापुढे नागरिकही निराश होऊन हार मानतात. मात्र, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये याच कामचुकार कर्मचाऱ्यांना शेराला सव्वाशेर मिळाल्याची प्रचिती मिळाली आहे (Tukaram Mundhe action against Municipal employee ). नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांचं चतुराईने थेट लोकेशन ट्रॅकिंग केलं आणि सकाळी 6 वाजताच निलंबनाची कारवाई केली.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळी 6 वाजता नागपूरच्या हजेरी शेडला भेट दिली. या ठिकाणी 9 कर्मचारी गैरहजर होते. तुकाराम मुंढे यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या घड्याळावरुन त्यांचं लोकेशन ट्रॅक केलं. यानंतर संबंधित कर्मचारी कामाच्या वेळी इतर ठिकाणी असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या या 9 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. या सर्व कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अगदी सकाळच्या वेळेत अचानक भेट देत केलेल्या या कठोर कारवाईने पालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे आता यापुढील काळात कर्मचाऱ्यांच्या कामात सुधारणा दिसेल अशी अपेक्षा नागपूरकरांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, नागपूरमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला जबाबदारपणे काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच कर्तव्यात कोणतीही कसूर आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. यानंतर मुंढेंनी कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर धडक कारवाईस सुरुवात केली आहे.
दुसरीकडे नागपूकरकरांकडूनही नियमांची पायमल्ली होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्याचपार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे, अन्यथा नाईलाजाने लॉकडाऊन लागू करावा लागेल असंही स्पष्ट केलं.
हेही वाचा :
‘कोरोना रुग्णांना कुणी बेड देता का हो बेड?’ भीम आर्मीचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन
सोलापूरचं प्रशासन भर पावसात रस्त्यावर, 10 वर गेलेला मृत्यूदर 5.7 टक्क्यांवर
Tukaram Mundhe action against Municipal employee