नागपूर : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Ahmadnagar corona positive)आहे. नुकतंच अहमदनगरमधील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे.
अहमदनगर शहरात दुबई येथे जाऊन आलेला कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाला अहमदनगरच्या सामान्य रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. या रुग्णांमध्ये अद्याप सर्दी, ताप, खोकला इत्यादी सारखे लक्ष आढळून आली नाही, अशी माहिती अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली.
नागपुरात कोरोनाचे 3 रुग्ण
नागपुरात कोरोनाचे (Nagpur corona positive) आणखी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 17 वर पोहोचली होती. एकट्या नागपुरात कोरोनाचे एकूण 3 रुग्ण (Nagpur corona positive) झाले आहेत. पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणखी दोघांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या रुग्णाची पत्नी आणि निकटवर्तीयालाही कोरोनाची लागण झाली. या तीनही कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले . सहा दिवसांपूर्वी ही व्यक्ती अमेरिकेतून आली. या व्यक्तीच्या अहवालानुसार, त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज त्या व्यक्तीच्या संपर्कातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.
हेही वाचा : खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स
कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोरोना विषाणूला जगभरात परसलेला साथीचा आजार (WHO Declare Corona As Pandemic) म्हणून घोषित केलं आहे. ‘या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात 4300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे याला जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणता येईल’, (WHO Declare Corona As Pandemic) असं WHO ने सांगितलं.
कोरोनाचे कुठे किती रुग्ण
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
संबंधित बातम्या
पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर
Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर
Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर
घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक
17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी
Corona | कोरोना हा जगभरात पसरलेला साथीचा आजार, WHO कडून घोषणा
Corona | Pandemic म्हणजे नेमकं काय? जगभर पसरलेले दोन ‘पॅनडेमिक’ कोणते?