नागपूर : नागपुरात दिवसेंदिवस (Nagpur Corona Statue) कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या 59 वर गेली आहे. त्यामुळे कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी नागपुरात कोरोनाचा पुतळा (Nagpur Corona Statue) उभारण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस आणि प्रशासनच्या वतीने दररोज नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोरोनाचा पुतळा शहरात उभारण्यात आला आहे. नागपुरातील टेलिफोन एक्सचेन्ज चौकात हा पुतळा लावला आहे. जे लॉकडाऊन असतानाही विनाकारण बाहेर फिरतात त्यांना कोरोनाची दहशत कळावी, लॉकडाऊन किती महत्त्वाचं आहे आणि याबाबतची जनजागृती व्हावी, म्हणून हा पुतळा उभारण्यात आला आहे.
Corona | राज्यात दिवसभरात 31 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 3320 वरhttps://t.co/uE452lQJVL
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 17, 2020
नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीत कोरोनाचे हॉटस्पॉट आहे. त्याच भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा पुतळा उभारण्यात आला आहे. या निमित्ताने लोकांनी घरी राहावं, लॉकडाऊनचं पालन करावं, असं आवाहन लकडगंज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नरेंद्र हिवरे यांनी केलं आहे (Nagpur Corona Statue).
राज्यात 3320 कोरोनाग्रस्त
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3320 वर पोहोचली आहे (Total Corona Patient in Maharashtra). राज्यात आज दिवसभरात 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 31 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 331 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली (Total Corona Patient in Maharashtra).
राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 3320 जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 74 हजार 587 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6376 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Nagpur Corona Statue
संबंधित बातम्या :
Lockdown : एपीएमसीतील फळ मार्केट सोमवारपासून पुन्हा सुरु
राज्यात प्रॉपर्टी व्यवहारांच्या नोंदणीस परवानगी, अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती
Corona | राज्यात दिवसभरात 31 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 3320 वर
लॉकडाऊन काळात 50 हजार गुन्हे दाखल, 1 कोटींचा दंड वसूल, 10 हजार जणांना अटक